घरक्रीडारिषभ पंतने पटकावला आयसीसीचा 'हा' पहिलावहिला पुरस्कार 

रिषभ पंतने पटकावला आयसीसीचा ‘हा’ पहिलावहिला पुरस्कार 

Subscribe

पंतने जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन उत्कृष्ट खेळी केल्या होत्या.

भारताचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत चांगल्या फॉर्मात आहे. सध्या सुरु असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत पंतने पहिल्या डावात अवघ्या ८८ चेंडूत ९ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ९१ धावांची खेळी केली. त्याआधी जानेवारी महिन्यातही त्याने दमदार खेळ केला होता. त्यामुळे त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (ICC) पहिलावहिला महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला. पंतने जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन उत्कृष्ट खेळी केल्या होत्या. भारताने सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आणि भारताच्या या यशात पंतने महत्वाची भूमिका बजावली होती. त्याने सिडनी येथे झालेल्या कसोटीत ९७ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. तर त्यानंतर ब्रिस्बन येथे झालेल्या अखेरच्या कसोटीत त्याने नाबाद ८९ धावांची मॅचविनिंग खेळी केली होती.

चाहत्यांचे आभार मानतो

‘संघाच्या यशात योगदान देणे हे कोणत्याही खेळाडूसाठी सर्वात मोठे यश असते. मात्र, यासारख्या पुरस्कारांमुळे युवा खेळाडूंचे मनोबल वाढते. मी हा पुरस्कार भारतीय संघातील माझ्या सर्व सहकाऱ्यांना समर्पित करतो. तसेच मला मते दिल्याबद्दल मी चाहत्यांचे आभार मानतो,’ असे पुरस्कार स्वीकारताना पंत म्हणाला. पुरुषांमध्ये या पुरस्कारासाठी पंत, इंग्लंडचा कर्णधार जो रूट आणि आयर्लंडचा सलामीवीर पॉल स्टर्लिंग यांच्यात चुरस होती.

- Advertisement -

महिलांमध्ये इस्माईल सर्वोत्तम 

महिलांमध्ये दक्षिण आफ्रिकेची शबनिम इस्माईल जानेवारी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरली. तिने पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय मालिकेच्या तीन सामन्यांत सात विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने या मालिकेत पाकिस्तानला ३-० असा व्हाईटवॉश दिला. आयसीसीने यंदाच्या वर्षापासून महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्याचा उपक्रम सुरु केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – IND vs ENG : ईशांतचे कसोटी बळींचे त्रिशतक


 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -