घरICC WC 2023Rohit Sharma : 61 धावांच्या खेळीत अनेक पराक्रम; डिव्हिलियर्स, गांगुली, मॉर्गनचा विक्रम...

Rohit Sharma : 61 धावांच्या खेळीत अनेक पराक्रम; डिव्हिलियर्स, गांगुली, मॉर्गनचा विक्रम मोडीत काढला

Subscribe

बंगळुरू : विश्वचषक 2023 मधील नेदरलँड्सविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात भारतीय संघाला नवमी साजरी करण्याची संधी आहे. आजच्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि शुभमन गिलसोबत मिळून संघाला चांगली सुरुवात करून दिली. रोहित शर्मा 61 धावांची खेळी करून बाद झाला, मात्र त्याने ही खेळी करताना एबी डिव्हिलियर्स, सौरव गांगुली आणि इऑन मॉर्गनचा विक्रम मोडीत काढला आहे. (Rohit Sharma Many feats in an innings of 61 runs AB De Villiers Saurav Ganguly, Eoin Morgan record was broken)

रोहित शर्माने नेदरलँड्सच्या कॉलिन अकरमनविरुद्ध डावाच्या 7व्या षटकातील चौथ्या चेंडूवर 92 मीटरचा षटकार ठोकला. यासह त्याने एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा दक्षिण आफ्रिकेचा महान सलामीवीर एबी डिव्हिलियर्सचा विश्वविक्रम मोडीत काढला आहे. एबी डिव्हिलियर्सच्या नावावर एका कॅलेंडर वर्षात 58 षटकार होते, तर या सामन्यापूर्वी रोहित शर्माने 58 षटकार मारले होते.

- Advertisement -

हेही वाचा – ‘त्या’ बैठकीत काय घडले होते? मिस्बाहचा मोठा खुलासा, बाबर आझम आणि कोचवर केले गंभीर आरोप

 • एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार ठोकणारे फलंदाज (ODI)
  रोहित शर्मा – 59 षटकार (2023 पर्यंत)
  एबी डिव्हिलियर्स – 58 षटकार (2015)
  ख्रिस गेल- 56 षटकार (2019)
  शाहिद आफ्रिदी- 48 षटकार (2002)
  मोहम्मद वसीम (UAE)- 47 षटकार (2023)

- Advertisement -

इऑन मॉर्गन विक्रम मोडला

यासोबतच विश्वचषकात कर्णधाराने मारलेल्या सर्वाधिक षटकाराचा विक्रमही रोहित शर्माने मोडला आहे. त्याने आता इंग्लंडच्या इऑन मॉर्गनच्या 22 षटकारांना मागे टाकले आहे. मॉर्गनने 2019 मध्ये हा विक्रम केला होता, जेव्हा त्याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने विश्वचषक जिंकला होता. आता तो विक्रमही रोहितने मोडीत काढला आहे.

 • विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणारे कर्णधार
  24* – रोहित शर्मा, 2023*
  22 – इऑन मॉर्गन, 2019
  21 – एबी डिव्हिलियर्स, 2015
  18 – आरोन फिंच, 2019
  17 – ब्रेंडन मॅक्युलम, 2015

हेही वाचा – उत्तरकाशीमध्ये निर्माणाधीन बोगदा कोसळला; आत अडकलेल्या 40 कामगारांना पाइपद्वारे ऑक्सिजन पुरवठा

सौरव गांगुली विक्रम मोडला

रोहित शर्माने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा विक्रम मोडीत काढला आहे. एकदिवसीय विश्वचषकाच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सौरव गांगुलीच्या नावावर होता. त्याने 2003 मध्ये विश्वचषकाच्या 11 सामन्यांत 465 धावा केल्या होत्या. तर सध्या सुरू विश्वचषकात रोहित शर्माने 8 सामने खेळताना 442 धावा केल्या होत्या आणि त्याला 24 धावांची गरज होती. त्याने आजच्या सामन्यात 61 धावांची खेळी करताना सौरव गांगुलीचा विक्रमही मोडीत काढला आहे.

रोहित शर्माने 14 हजार धावांचा टप्पाही ओलांडला

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सलामीवीर म्हणून रोहित शर्माने 14 हजार धावांचा टप्पाही ओलांडला आहे. त्याच्या पुढे आता. वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर आहेत.

 • भारताकडून सलामीवीर म्हणून 14 हजार करणारे फलंदाज
  15758 – वीरेंद्र सेहवाग
  15335 –  सचिन तेंडुलकर
  14005 – रोहित शर्मा
  12258 – सुनील गावस्कर
  10867 – शिखर धवन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -