घरक्रीडालंडनमध्ये डिनर करताना सचिन शेन वॉर्नच्या आठवणीने झाला भावूक; सोशल मीडियावर पोस्ट...

लंडनमध्ये डिनर करताना सचिन शेन वॉर्नच्या आठवणीने झाला भावूक; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

Subscribe

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुरकर (Sachin Tendulkar) यानेही शेन वॉर्नची आठवण काढली. सचिनने नुकताच सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे.

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा (Australia Cricket Team) दिग्गज खेळाडू शेन वॉर्नचं (Shane Warn) वयाच्या ५२ व्या वर्षी निधन झाले. मात्र, शेन वॉर्नचे निधन झाले असले तरी त्याच्या आठवणी अजून कायम आहेत. अनेक दिग्गज खेळाडू कोणत्याना कोणत्या कारणाने त्याची आठवण काढत असतात. अशातच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुरकर (Sachin Tendulkar) यानेही शेन वॉर्नची आठवण काढली. सचिनने नुकताच सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे. (sachin tendulkar remembers shane warne while dinner at london restaurant)

युके मध्ये शेन वॉर्न जेथे राहायचा, त्याजवळच असलेल्या एका हॉटेलमध्ये सचिन तेंडुलकर आणि शेन वॉर्न नेहमी डिनरसाठी जात असत. सचिन नुकताच या हॉटेलमध्ये डिनर करण्यासाठी बसला होता, त्यावेळी त्याने फोटो पोस्ट करत शेन वॉर्नसाठी भावनिक पोस्ट केली. सचिनने ही पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत असून, चाहतेही या पोस्टवर भावनिक कमेंट्स करत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – दिवंगत शेन वार्नच्या ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ला २९ वर्ष पूर्ण

 

View this post on Instagram

 

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar)

सचिन तेंडुलकर नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. तसेच, सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट टाकून तो चांहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो.

- Advertisement -

दरम्यान, शेन वॉर्न याचं ४ मार्च २०२२ वयाच्या ५२व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. तो थायलंडमध्ये होता. शेन वॉर्नच्या निधनाची बातमी क्रिडाविश्वासाठी सर्वात मोठा धक्का देणारी होती. कारण जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंच्या यादीत वॉर्नचे नाव समाविष्ट आहे. आज शेन वार्न आपल्यात नसला तरी क्रिकेट विश्वात त्यानं केलेले विक्रम आजही कायम आहेत.


हेही वाचा – आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, असा असेल भारतीय संघ

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -