घरक्रीडाIPL मध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; दिल्ली कॅपीटल्स खेळाडूंच्या किट बॅग्स, पॅड इतर सामान...

IPL मध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; दिल्ली कॅपीटल्स खेळाडूंच्या किट बॅग्स, पॅड इतर सामान चोरीला

Subscribe

दिल्ली कॅपिटल्स संघाच्या खेळाडूंचं सामान चोरीला गेलं आहे. दिल्ली संघातील खेळाडूंच्या एकूण 16 बॅट्स चोरीला गेल्या आहेत. त्याशिवाय खेळाडूंकडील अन्य समानही चोरट्यांनी चोरले आहे. दिल्लीची संघ बेंगळुरुहून दिल्लीला परतत होता. त्यादरम्यान, खेळाडूंचे सामान चोरीला गेले.

भारतात सध्या IPL सामने सुरु असून प्रेक्षकदेखील मोठ्या संख्येने स्टेडियमध्ये जाऊन सामन्याचा आनंद लुटत आहेत. आयपीएलच्या या सीजनमध्ये दिल्ली क‌ॅपिटल्स संघाला सलग पाच सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं. आता या संघाच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. दिल्ली कॅपिटल्स संघाच्या खेळाडूंचं सामान चोरीला गेलं आहे. दिल्ली संघातील खेळाडूंच्या एकूण 16 बॅट्स चोरीला गेल्या आहेत. त्याशिवाय खेळाडूंकडील अन्य समानही चोरट्यांनी चोरले आहे. दिल्लीची संघ बेंगळुरुहून दिल्लीला परतत होता. त्यादरम्यान, खेळाडूंचे सामान चोरीला गेले.  (Scam of thieves in IPL Kit bags pads and other belongings of Delhi Capitals players were stolen )

चोरीला गेलेल्या वस्तूमंध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वाॅर्नर आणि विकेटकिपर फलंदाज फिल साॅल्टच्या किटमधून प्रत्येकी तीन बॅट गायब झाल्या आहेत. तर अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शच्या दोन ब‌ॅट्स चोरट्यांनी गायब केल्या आहेत. युवा खेळाडू यश धुलच्या पाच बॅटसुद्धा चोरीला गेल्या आहेत. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा खेळाडूंचे सामान त्यांच्या हाॅटेलच्या खओलीत पोहोचले तेव्हा त्यांनी चोरी झाल्याचं समजलं. याशिवाय अनेक खेळाडूंचे बूट आणि हातमोजेही गायब होते.

- Advertisement -

चोरीमुळे पुढच्या सामन्यात अडचण

दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडू आजच्या सामन्यासाठी दिल्लीला पोहोचले आहेत. खेळाडूंनी आपल्या खोलीचा ताबा घेतला. काही वेळाने त्यांचं सामान रुमवर पोहोचवण्यात आलं तेव्हा सामानातील अनेक गोष्टी गायब असल्याचं खेळाडूंना आढळलं. या चोरीमुळे खेळाडूंना धक्का बसला आहे. यश आणि फिल यांच्या रेडी टू प्ले बॅट्स गायब असल्याने त्यांना आता पुढील सामन्यात अडचण होऊ शकते.

( हेही वाचा: अर्जुन, तू तुझ्या वडिलांपेक्षा मोठे काम केले आहेस; असे का म्हणाले रवी शास्त्री? )

- Advertisement -

दिल्ली क‌ॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आज रंगणार आहे. दिल्लीच्या घरच्या मैदानावरील सामन्याच्या आधीच दिल्ली संघाला हा मोठा धक्का बसला आहे. दिल्ली क‌ॅपीटल्सने डेव्हिड वाॅर्नरच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या दिल्लीने आत्तापर्ंयत सर्वच्या सर्व पाचही सामने गमावले आहेत. त्यामुळे आता त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपल्यात जमा आहे. डेव्हिड वाॅर्नर आणि अष्टपैलू अक्षर पटेल वगळता इतर कोणत्याही खेळाडूला चांगली कामगिरी करता आलेली नाही. स्पर्धेतील आव्हान कायम ठेवायचं असेल तर दिल्लीच्या संघाला इशून पुढे सर्व सामने जिकांवं लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -