घरक्रीडाUS OPEN 2018: सेरेना नवव्यांदा उपांत्य फेरीत

US OPEN 2018: सेरेना नवव्यांदा उपांत्य फेरीत

Subscribe

अमेरिकेची स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिने अमेरिकन ओपनच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. तिने उप-उपांत्य फेरीत ७ व्या सीडेड कॅरोलिना प्लिस्कोव्हाचा पराभव केला.

६ वेळा अमेरिकन ओपन विजेत्या सेरेना विलियम्सने चेक रिपब्लिकच्या कॅरोलिना प्लिस्कोव्हाचा ६-४, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव करत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. अमेरिकन ओपनच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याची ही तिची नववी वेळ आहे.

Sealed with an ace!@serenawilliams prevails under the lights to defeat Pliskova 6-4, 6-3!

- Advertisement -

She’ll face Sevastova in the semifinals…#USOpen pic.twitter.com/zfpYDp9oBb

— US Open Tennis (@usopen) September 5, 2018

- Advertisement -

कसा झाला सामना 

पहिल्या सेटमध्ये सेरेनाची दुसरीच सर्विस मोडत प्लिस्कोव्हाने सामन्यात २-१ अशी आघाडी मिळवली. पुढे प्लिस्कोव्हाकडे ४-३ अशी आघाडी असताना सेरेनाने तिची सर्विस मोडत सामन्यात ४-४ अशी बरोबरी केली. सेरेनाने आपली सर्विस कायम ठेवत ५-४ अशी आघाडी मिळवली. यानंतर सेरेनाने प्लिस्कोव्हाची सर्विस मोडत हा सेट ६-४ असा जिंकला.
तर दुसऱ्या सेटची सुरूवात सेरेनाने अगदी आक्रमक केली. या सेटचे पहिले ४ गेम जिंकत तिने ४-० अशी आघाडी मिळवली. इतकी मोठी आघाडी कमी करण्यात प्लिस्कोव्हाला यश आले नाही. त्यामुळे सेरेनाने हा सेट ६-३ असा जिंकत सामनाही जिंकला.
प्रेक्षकांमुळे वाढला जोश 
अमेरिकेच्या सेरेनाला या स्पर्धेत घरच्या प्रेक्षकांचा खूप पाठिंबा मिळत आहे. प्लिस्कोव्हाविरुद्धच्या सामन्यानंतर ती म्हणाली,” या सामन्याची सुरुवात माझ्यासाठी चांगली झाली नाही. पण प्रेक्षक मला खूप पाठिंबा देत होते त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला आणि हा सामना मी जिंकला.”
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -