घरक्रीडाशिवनेरी सेवा मंडळ खो-खो

शिवनेरी सेवा मंडळ खो-खो

Subscribe

रा. फ. नाईक विद्यालय अजिंक्य

ठाण्याच्या रा. फ. नाईक विद्यालय संघाने शिवभक्त विद्यालयाचा १५-१२ असा पराभव करत शिवनेरी सेवा मंडळ खो-खोच्या महिला राज्यस्तरीय स्पर्धेचे जेतेपद पटकावले, तसेच पुरुष व्यावसायिक स्पर्धेत मध्य रेल्वेने पश्चिम रेल्वेचा १५-१३ असा दोन गुण व एक मिनिटे राखून पराभव केला.

महिला राज्यस्तरीय स्पर्धेचा अंतिम सामना रंगतदार झाला. या सामन्याचा निकाल जादा डावात लागला. मध्यांतराला हा सामना ५-५ असा तसेच पूर्ण डावांनंतर हा सामना ७-७ असा बरोबरीत होता. मात्र, जादा डावात रा. फ. नाईकने आपला खेळ उंचावला आणि सामना खिशात टाकला. रा. फ. नाईककडून पौर्णिमा सकपाळ (३:४०, ३:२०, १:२० मि. संरक्षण आणि २ गडी), रुपाली बडे (२:००, ३:००, २:१० मि. संरक्षण), प्रणाली मगर (२:००, ३:००, २:१० मि. संरक्षण आणि २ गडी), पूजा फडतरे (३ गडी) यांनी चांगला खेळ केला. शिवभक्ततर्फे प्रियांका भोपीने २:१०, नाबाद ४:४० , २:३० मिनिटे संरक्षण आणि आक्रमणात चार गडी बाद करत चांगली झुंज दिली. तिसर्‍या क्रमांकाच्या सामन्यात रत्नागिरीच्या आर्यन स्पोर्ट्स क्लबने उस्मानाबादच्या छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळाचा ०९-०५ असा पराभव केला.

- Advertisement -

पुरुष व्यावसायिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत मध्य रेल्वेने पश्चिम रेल्वेवर १५-१३ अशी दोन गुणांनी मात केली. या सामन्याच्या मध्यांतराला मध्य रेल्वेकडे ८-७ अशी अवघ्या एका गुणाची आघाडी होती. मध्य रेल्वेकडून दीपेश मोरे (२:००, २:१० मि. संरक्षण आणि ५ गडी), मिलिंद चावरेकर (२:००, १:३० मि. संरक्षण आणि १ गडी) आणि आदित्य येवरे (१:२०, १:०० मि. संरक्षण आणि २ गडी) यांनी दमदार खेळ केला. बृहन्मुंबई महानगर पालिकेने विद्युत महावितरण कंपनीला ११-१० असे पराभूत करून तिसरा क्रमांक पटकावला.

महिला राज्यस्तरीय स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू

- Advertisement -

अष्टपैलू : पौर्णिमा सकपाळ (रा. फ. नाईक विद्यालय)
संरक्षक : रुपाली बडे (रा. फ. नाईक विद्यालय)
आक्रमक : मनोरमा शर्मा (शिवभक्त विद्यालय)

पुरुष व्यावसायिक राज्यस्तरीय स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू

अष्टपैलू :- दिपेश मोरे ( मध्य रेल्वे )
संरक्षक :- मिलिंद चावरेकर ( मध्य रेल्वे )
आक्रमक :- रंजन शेट्टी ( पश्चिम रेल्वे )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -