घरलोकसभा २०१९इच्छुकांना थांबवण्याचे पवारांसमोर आव्हान

इच्छुकांना थांबवण्याचे पवारांसमोर आव्हान

Subscribe

दोन दिवसांच्या नाशिक दौर्‍यात नाशिक; दिंडोरीतील उमेदवार निश्चितीचा अंदाज

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रविवार (ता.३) पासून जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. त्यांना भेटण्यासाठी इच्छुकांमध्ये चढाओढ लागली आहे. त्यांची गुप्त भेट घेऊन आपली अंतस्थ भावना थेट पोहोचवण्याची व्यूहरचना आखली जात आहे. या दौर्‍यात कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर ते नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदार संघातील पक्षाचे उमेदवार निश्चित करतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातील गटबाजी उघडकीस आल्यानंतर त्यांनी राज्यातील सर्वच ठिकाणी कार्यकर्त्यांना समज देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नाशिकमध्येही पक्षांतर्गत गटबाजी रोखण्यासाठी रविवारी (ता.3) व सोमवारी (ता.4) दोन दिवस ते नाशिक जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरुन पक्षांतर्गत उफाळलेली गटबाजी रोखण्याचे प्रमुख आव्हान त्यांच्यासमोर आहे. दिंडोरीमध्ये डॉ.भारती पवार यांनी गत पाच वर्षापासून तयारी सुरू केलेली असताना निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांना राष्ट्रवादीत घेऊन त्यांना उमेदवारी देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. महाले यांच्या प्रवेशामुळे विचलित झालेल्या पवार यांनी पक्षांकडे बांधलेली उमेदवारीची अटकळ अद्याप सोडलेली नाही. त्यामुळे महाले व पवार यापैकी कोणाला राष्ट्रवादीचे तिकिट मिळते यावर भाजपचे गणित अवलंबून आहे.

- Advertisement -

ऐनवेळी नाराज उमेदवाराला पक्षात घेऊन त्याला उमेदवार म्हणून घोषित करण्याची खेळी भाजपकडून खेळली जाऊ शकते. तसेच माजी आमदार व भाजपकडून इच्छुक असलेले अ‍ॅड.माणिकराव कोकाटे यांच्या उमेदवारीपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. युतीच्या घोषणेमुळे विचलित झालेले कोकाटे नुकतेच मातोश्रीसह मुख्यमंत्र्यांनाही भेटून आले. कोणत्याही परिस्थितीत लोकसभेची उमेदवारी करण्याचा त्यांनी निर्धार केल्यामुळे कोकाटे कोणत्याही पक्षाचा झेंडा हाती घेतील, असे वातावरण त्यांनी निर्माण केले आहे. त्यातही राष्ट्रवादीचे तिकिट मिळाल्यास उमेदवारी अधिक सुकर ठरेल,याची पुरेपूर जाणीव असणारे कोकाटे यांनी लागलीच शिवसेना व भाजपकडे उमेदवारीची अटकळ बांधली. युतीची उमेदवारी मिळणे अशक्य असल्याचे दिसताच त्यांनी राष्ट्रवादीकडे अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. त्यासाठी कोकाटेदेखील पवारांना भेटतील, अशी शक्यता वर्तवली जाते. तथापि, नाशिकमध्ये माणिकराव कोकाटे आणि दिंडोरीत डॉ.भारती पवार यांच्यामध्ये उमेदवारीवरून अपेक्षेचा एकसमान धागा निर्माण झाला आहे. दोघांचाही निश्चय पक्का असल्यामुळे त्यांनी शरद पवारांच्या भेटीसाठी आग्रह धरल्याचे समजते.

’अभी नही तो कभी नही’
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा हा दौरा असेल. त्यामुळे या दौर्‍यात उमेदवारीचे तिकिट पदरात पाडून घेण्यासाठी प्रत्येक जण आपले ‘बळ’अजमावताना दिसतो. ‘अभी नही तो कभी नही’ या भावनेतून इच्छुकांनी जोरदार प्रयत्न चालवले असून पवार नेमकी काय गुगली टाकतात हे पाहणे औस्त्युक्याचा विषय ठरणार आहे.

- Advertisement -

कोकाटेंना ’प्रहार’चे साकडे
सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी लोकसभा निवडणुकीचा निर्धार केल्यामुळे त्यांना ’प्रहार’तर्फे उमेदवारी देण्याची अटकळ बांधली आहे. आमदार बच्चू कडू येत्या सोमवारी (ता.४) त्यांची भेट घेणार असल्याचे समजते. अपक्ष लढण्यापेक्षा छोट्या पक्षांची उमेदवारी स्वीकारून निवडणूक आखाड्यात उतरण्याचा निर्णय एनवेळी घेतला जाऊ शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -