घरक्रीडामला बॉल टॅम्परिंग थांबवायची संधी होती - स्टिव्ह स्मिथ

मला बॉल टॅम्परिंग थांबवायची संधी होती – स्टिव्ह स्मिथ

Subscribe

स्मिथ आणि वॉर्नर यांच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियन संघाला चांगले प्रदर्शन करण्यात अपयश आले आहे.

द.आफ्रिकेविरुद्ध मार्चमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात बॉल टॅम्परिंग केल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा खेळाडू स्टिव्ह स्मिथवर एका वर्षाची बंदी घालण्यात आली होती. त्याच्यासोबतच डेविड वॉर्नर याच्यावर एका वर्षाची तर कॅमरुन बॅन्क्रॉफ्टवर ९ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. हे प्रकरण झाल्यानंतर या तिघांनीही माफी तर मागितली होती पण प्रकरणाचा खुलासा केला नव्हता. मात्र, आता स्मिथने या प्रकरणाचा खुलासा करताना ‘मला ते थांबवायची संधी होती’ असे काबुल केले आहे.’

कर्णधार म्हणून हे माझे अपयश 

बॉल टॅम्परिंग प्रकरणाबाबत स्मिथ म्हणाला, “आम्ही ड्रेसिंग रूममध्ये असताना मी याबाबतची चर्चा ऐकली होती. पण मी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे मी असे म्हणू शकतो की मला हा सर्व प्रकार थांबवायची संधी होती पण मी तो थांबवला नाही. कर्णधार म्हणून हे माझे अपयश होते. मला त्यावेळी कळायला हवे होते की त्या चर्चेतून काहीतरी वाईट घडू शकते आणि ते घडलेच. जे मैदानात झाले ते मी थांबवू शकत होतो पण मी त्याविषयी काहीच केले नाही, हे माझे अपयश होते.”

विश्वचषकासाठी संघात परतण्याचे लक्ष्य   

स्मिथ आणि वॉर्नर यांच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियन संघाला चांगले प्रदर्शन करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे या दोघांच्या बंदीचा कालावधी संपताच ते ऑस्ट्रेलियन संघात पुनरागमन करतील असा अंदाज आहे. मे २०१९ मध्ये विश्वचषकाला सुरुवात होणार आहे आणि त्याआधी संघात परतण्याचे स्मिथचे लक्ष्य आहे. त्याबाबत तो म्हणाला, “मी सध्या जोरदार सराव करतो आहे. माझे विश्वचषक आणि अॅशेस आधी संघात परतण्याचे लक्ष्य आहे. मला ठाऊक आहे की इंग्लंडमधील प्रेक्षक माझ्या विरोधात असतील पण मी त्यासाठी तयार आहे.”
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -