IPL मध्ये सुरेश रैनाची होणार एन्ट्री, गुजरात टायटन्समध्ये मिळू शकते संधी, काय आहे व्हायरल सत्य

गुजरात टायटन्समध्ये त्याच्या प्रवेशाची अटकळ का होती? त्यामागचे कारण आहे इंग्लिश सलामीवीर जेसन रॉय. जेसन रॉयने आयपीएलच्या या हंगामातून आपले नाव मागे घेतले.

नवी दिल्ली : चेन्नई सुपर किंग्जमधून सुरेश रैना बाहेर पडल्यानंतर 2022 च्या आयपीएल लिलावात तो विकला गेलेला नव्हता. लिलावात कोणत्याही फ्रँचायझीने त्याच्यामध्ये स्वारस्य दाखवले नव्हते, परंतु आता रैनाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो आयपीएलच्या या हंगामात पदार्पण करत असलेल्या गुजरात टायटन्स फ्रेंचायझीच्या जर्सीत दिसत आहे. त्यानंतर सुरेश रैना आयपीएल 2022 मध्ये प्रवेश करणार आहे आणि त्याला गुजरात टायटन्समध्ये स्थान मिळू शकते, अशीही चर्चा रंगलीय.

गुजरात टायटन्समध्ये त्याच्या प्रवेशाची अटकळ का होती? त्यामागचे कारण आहे इंग्लिश सलामीवीर जेसन रॉय. जेसन रॉयने आयपीएलच्या या हंगामातून आपले नाव मागे घेतले. त्यानंतर रॉयच्या जागी रैनाचा संघात प्रवेश करण्याबाबत चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत आणि चाहते टायटन्स नावाच्या जर्सीसह रैनाचा फोटो एडिट करत आहेत आणि सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

सुरेश रैनाने गुजरातचे नेतृत्व केलेय

जेसन रॉय दीर्घकाळ बायो बबलमध्ये राहिल्यामुळे आलेल्या थकव्यामुळे स्पर्धेतून माघार घेतली. जेसन रॉयच्या पर्यायाबद्दल सुरेश रैनाचे नाव का चर्चेत आले? त्यामागचे कारण म्हणजे रैनाने आयपीएलमध्ये गुजरातच्या फ्रँचायझीचे नेतृत्व केलेय. जेव्हा राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्जवर स्पॉट फिक्सिंगमुळे 2 वर्षांची बंदी घालण्यात आली होती. त्यावेळी गुजरात लायन्सने आयपीएलमध्ये 2 वर्षांसाठी प्रवेश केला होता. रैनाने लायन्सचे नेतृत्व केले होते. याच कारणामुळे जेसन रॉयचे नाव मागे घेतल्यानंतर चाहत्यांमध्ये सुरेश रैनाच्या नावाची चर्चा सुरू झाली. गुजरात टायटन्सचा संघ हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली आयपीएलमध्ये उतरणार आहे. या संघात राशिद खान, मोहम्मद शमी, शुभमन गिल या खेळाडूंचा समावेश आहे.


हेही वाचाः cordelia cruise drug case : शाहरुख पुत्र आर्यन खानकडे ड्रग्ज सापडलेच नव्हते, NCB एसआयटीच्या तपासात मोठा खुलासा