घरक्रीडाT20 WC : अखेर हसन अलीने मागितली माफी; म्हणाला, याच्यातून शिकायला...

T20 WC : अखेर हसन अलीने मागितली माफी; म्हणाला, याच्यातून शिकायला …

Subscribe

पाकिस्तानमध्ये हसन अली आणि त्याच्या पत्नीला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले दरम्यान हसन अलीने पाकिस्तानी क्रिकेट प्रेमींची माफी मागितली आहे

टी-२० विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तानच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. सामन्यादरम्यान पाकिस्तानचा गोलंदाज हसन अलीने मॅथ्यू वेडचा झेल सोडला होता. सोबतच पाकिस्तानी गोलंदाजांनी खराब गोलंदाजी पण केली होती. दरम्यान यावरूनच आता हसन अलीने माफी मागितली आहे. त्याने ट्विटरच्या माध्यमातून एक पोस्ट करून पाकिस्तानी चाहत्यांची माफी मागितली आहे. हसन अलीने मॅथ्यू वेडचा सोडलेला झेल पाकिस्तानला चांगलाच महागात पडला होता. वेडने झेल सुटल्यानंतर सलग तीन षटकार मारून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला होता. याच्यानंतर पाकिस्तानमध्ये हसन अली आणि त्याच्या पत्नीला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले. दरम्यान हसन अलीने पाकिस्तानी क्रिकेट प्रेमींची माफी मागितली आहे.

हसन अलीने ट्विटच्या माध्यमातून म्हटले की, “मला माहित आहे तुम्ही सगळेजण माझ्यावर नाराज आहात. कारण मी तुमच्या अपेक्षेप्रमाणे खेळी केली नाही. पण माझ्यापेक्षा दु:खी कोणी असू शकत नाही. तुम्हाला माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्यासाठी मी नाराज आहे. मला आपल्या देशाची सेवा करायची आहे. मी पुन्हा एकदा चांगली मेहनत करत आहे आणि लवकरच तयार होऊन तुमच्यासमोर येणार आहे. तुमच्या प्रार्थनांसाठी धन्यवाद. मला त्याची खूप गरज होती”.

- Advertisement -

हसन अलीची पत्नी सामिया भारताची रहिवासी आहे. ट्रोल करणाऱ्यांनी हसन आणि त्याच्या पत्नीला खूप ट्रोल केले होते. हसनला पाकिस्तानी लोकांनी गद्दार देखील संबोधले होते. काहींनी तर ट्विटच्या माध्यमातून हसनला गोळी मारायची भाषा केली होती. सामिया हरियाणातील नूंह जिल्ह्याच्या चंदेनी गावातील राहणारी आहे. ती एमिरेट्स एअरलाइन्समध्ये एक फ्लाइट इंजिनिअर आहे.

- Advertisement -

हे ही वाचा : व्हीव्हीएस लक्ष्मण होणार NCA चे प्रमुख; BCCI अध्यक्ष सौरव गांगुलींनी दिली माहिती


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -