घरताज्या घडामोडीगडचिरोलीत १०० हून अधिक नक्षली लपल्याचा अंदाज, पोलिसांची माहिती

गडचिरोलीत १०० हून अधिक नक्षली लपल्याचा अंदाज, पोलिसांची माहिती

Subscribe

नक्षली कमांडर तेलतुंबडेला कंठस्नान

या संपूर्ण ऑपरेशनमध्ये डीआयजी सरांच्या मार्गदर्शनाखाली हा ऑपरेशन प्लॅन करण्यात आला. त्यामध्ये अॅडिशनल एसपी समीर आणि आहिरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे ग्राऊंडवर लीड करत होते. त्यांनी ही संपूर्ण योजना तयार केली आणि शेवटी सी-६० च्या पोलीस जवानांनी गोळीबार करत त्यांना चोख प्रत्यूत्तर दिलं आहे. अशी माहिती गडचिरोली पोलिसांनी दिली आहे. या चकमकीत चार जवानांना दुखापत झाली असून नक्षलवाद्यांना चांगलाच धडा शिकवला आहे. परंतु काही नक्षलवाद्यांना पळून जाण्यात यश मिळाले आहे. मात्र, त्यांचा आम्ही कसोसीने शोध घेणार आहोत. असं एसपी म्हणाले आहेत.

१०० हून अधिक नक्षली तिथे असल्याचा अंदाज

१०० पेक्षा जास्त नक्षलवादी असण्याची शक्यता आणि अनुमान गडचिरोली पोलीसांकडून वर्तवली जात आहे. ज्याप्रमाणे ते गोळ्या झाडत होते आणि संतापाच्या भरात हल्ला करत होते. त्यामुळे जवळपास तिथे १०० नक्षलवादी असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

- Advertisement -

गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलवाद्यांचं प्रमाण वाढतंय..

नक्षलवाद्यांचे कॅम्प हे कुठेनाकुठे चालूच असतात. परंतु नेमका हा कॅम्प कशासाठी होता. याबाबत संपूर्ण निरिक्षण केल्यानंतरच आम्ही माहिती देऊ शकतो. परंतु महत्त्वाचं म्हणजे गडचिरोली जिल्ह्यामध्ये बाहेर आलेल्या नक्षलवाद्यांचं प्रमाण वाढत आहे. लोकल नक्षलला अटक झाल्यानंतर, सुटका झाल्यानंतर किंवा ठार झाल्यानंतर ग्रामीण भागातील मुलांकडून त्यांना हवातसा प्रतिसाद अद्यापही मिळालेला नाहीये. या सर्व गोष्टींची चाचपणी केली असता, बाहेरूनचं येणाऱ्या नक्षलवाद्यांचं प्रमाण वाढलेलं दिसत आहे. अशी माहिती गडचिरोली पोलिसांनी दिलीये.

नक्षली कमांडर तेलतुंबडेला कंठस्नान

महाराष्ट्र छत्तीसगढ सीमेलगत असणाऱ्या ग्यारापत्ती जंगल परिसरात सी-६० पोलिसांशी झालेल्या चकमकीत ६ महिला आणि २६ नक्षलवादी ठार झाल्यामुळे नक्षलवाद्यांना मोठा धक्का बसला आहे. सुमारे दहा ते बारा तास सुरू असलेल्या या चकमकीत नक्षलवाद्यांचा म्होरक्या मिलिंद तेलतुंबडेला कंठस्नान घालण्यात यश आल्याची माहिती, गडचिरोली पोलिसांनी दिली. तीन पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. त्यानंतर जखमी पोलिसांना तात्काळ हेलिकॉप्टरच्या सहाय्याने नागपूर येथे हलवण्यात आले होते.

- Advertisement -

हेही वाचा: अरे शहाण्या…तू आमदार आहेस ; मास्कवरून अजित पवारांनी पुतण्याला झापलं


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -