घरक्रीडाIND vs BAN : सामना न खेळताच 'या' खेळाडूने जिंकली चाहत्यांची मनं

IND vs BAN : सामना न खेळताच ‘या’ खेळाडूने जिंकली चाहत्यांची मनं

Subscribe

टी-20 विश्वचषकात ब गटातील भारत आणि बांगलादेश यांच्यात ॲडलेडमध्ये सामना खेळला गेला. अटीतटीच्या सामन्यात भारतीय संघाचा बांगलादेशवर 5 धावांनी निसटता विजय झाला. तसेच, भारताचे उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे.

टी-20 विश्वचषकात ब गटातील भारत आणि बांगलादेश यांच्यात ॲडलेडमध्ये सामना खेळला गेला. अटीतटीच्या सामन्यात भारतीय संघाचा बांगलादेशवर 5 धावांनी निसटता विजय झाला. तसेच, भारताचे उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे. विश्वचषकासारख्या स्पर्धांमध्ये प्रत्येक संघातील खेळाडू हे संघाला विजय मिळवून देण्यासाठी स्वत:ला झोकून देतात. त्यानंतर त्यांच्या खेळीची सर्वत्र चर्चा केली जाते. मात्र, बुधवारी झालेल्या भारत आणि बांगलादेशच्या सामन्यात संघाबाहेर असलेल्या भारतीय संघाच्या एका खेळाडूने मैदानाबाहेरून खेळाडूंना केलेल्या मदतीच जोरदार चर्चा रंगली आहे.

भारत आणि बांगलादेश सामन्यात संघाबाहेर बसलेल्या साईड आर्म थ्रोवर रघूने महत्वाचे काम केले. सामना सुरु असताना रघू सीमारेषेवर उभा होता. त्यावेळी रघूने क्रिकेटवर आणि देशावर असलेल्या निष्ठेपोटी खेळाडूंचे शुज साफ करुन देत होता. (Team India Sidearm Thrower Raghu Cleans Shoes Of Players To Prevent Them From Slipping)

- Advertisement -

नेमकं रघु काय काम करत होता?

भारत आणि बांगलादेशचा सामना सुरु असताना सीमारेषेवर ब्रश घेऊन उभा असलेला रघू कॅमेऱ्यात टिपला गेला. भारत आणि बांगलादेशच्या या सामन्यातील दुसऱ्या इनिंगमध्ये म्हणजेच बांगलादेशच्या फलंदाजीवेळी 7वे षटक झाल्यानंतर पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे काहीवेळ हा सामना थांबवण्यात आला होता. पाऊस थांबल्यानंतर खेळाला पुन्हा सुरुवात करण्यात आली. त्यावेळी भारतीय संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला. मात्र, पावसामुळे संपूर्ण मैदानात थोडासा चिखल झाला होता. मैदान ओले असल्यावर माती त्यांच्या बुटांना चिकटते. त्यामुळे चेंडू पकडण्यासाठी धावताना खेळाडू घसरुन पडण्याची शक्यता होती. अशावेळी रघू हा भारतीय संघाच्या खेळाडूंची बूट साफ करत होता. त्याच्या कामाचे सध्या संपूर्ण देशातून त्याचे कौतुक केले जात आहे.

- Advertisement -

रघू हा सीमारेषेवर जाऊन उभा असताना तो भारतीय खेळाडूंच्या शूजला लागलेली माती ब्रशने साफ करुन देत होता. अगदी सामना संपेपर्यंत रघू पाण्याची बाटली आणि ब्रश घेऊन सीमारेषेवर उभा होता.

दरम्यान, रघू हा भारतीय संघाचा साईड आर्म थ्रो डाऊन स्पेशालिस्ट आहे. नेटमध्ये भारतीय फलंदाज सराव करत असताना रघू त्यांना मदत करतो.


हेही वाचा – पाकिस्ताननंतर बांगलादेशविरुद्धचा सामनाही विराट कोहलीसाठी ठरला वादग्रस्त

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -