घरमनोरंजनअक्षय कुमारला अ‍ॅक्टिंग सुद्धा येत नाही...अक्षयला शिवरायांच्या भूमिकेत पाहून नेटकऱ्यांची टीका

अक्षय कुमारला अ‍ॅक्टिंग सुद्धा येत नाही…अक्षयला शिवरायांच्या भूमिकेत पाहून नेटकऱ्यांची टीका

Subscribe

महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात‘ या चित्रपटाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुधवारी झाला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, चित्रपटाचे निर्माते वसीम कुरेशी, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार प्रताप सरनाईक आदी उपस्थित होते. महेश मांजरेकरेकरांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटातून बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटामध्ये अक्षय छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. बुधवारी झालेल्या सोहळ्यात अक्षयच्या फर्स्ट लूकची झलकही दाखवण्यात आली.

- Advertisement -

 

अक्षय कुमार ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटातून मराठी चित्रपटात पदार्पण करत आहेत. यामुळे अक्षयचे अनेक चाहते खुश झाले आहेत. मात्र, सोशल मीडियावर अनेकजण मराठी चित्रपटात बॉलिवूड कलाकाराला शिवाजी महाराजांची भूमिका दिल्यामुळे नाराजी व्यक्त करत आहेत.

- Advertisement -

नेटकऱ्यांच्या मते, महेश मांजरेकरांनी आगामी चित्रपटात शिवरायांच्या भूमिकेसाठी बॉलिवूड कलाकाराची निवड का केली? त्यांपैकी एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलंय की, “मराठी चित्रपटाला भीक लागली वाटतं”. तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलंय की, “तुम्हाला मराठी कलाकार मिळाले नाहीत का? तेच महाराजांची भूमिका व्यवस्थित करु शकतात”. तर तिसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिलंय की, “अक्षय कुमारला अॅक्टिंग सुद्धा येत नाही मागील पृथ्वीराज चौहान चित्रपटाचे काय वाटोळे केले”.

अक्षय व्यतिरिक्त हे कलाकारही असणार मुख्य भूमिकेत

‘वेडात मराठे वीर दौडले सात‘ चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त विराज मडके, तुळजा जामकर, जय दुधाणे, हार्दिक जोशी, उत्कर्ष शिंदे, विशाल निकम, सत्यम मांजरेकर आणि प्रवीण तरडे हे कलाकार देखील चित्रपटात मुख्य भूमिका साकारतील.  डिसेंबरमध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून, वर्ष 2023 मध्ये दिवाळीत प्रदर्शित होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


हेही वाचा :

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -