घरमहाराष्ट्रशरद पवार आणखी 2 दिवस रुग्णालयात; राष्ट्रवादीच्या शिबिराबाबतही संभ्रम

शरद पवार आणखी 2 दिवस रुग्णालयात; राष्ट्रवादीच्या शिबिराबाबतही संभ्रम

Subscribe

शरद पवार यांना बरे होण्यासाठी आणखी 1 ते 2 दिवस लागतील अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रकृती बिघडल्याने त्यांना मागील दोन दिवसांपासून मुंबईमधील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागील दोन दिवसांपासून शरद पवार यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान शरद पवार यांना काल संध्याकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता होती. पण डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार शरद पवारांवर सद्यस्थितीत रुग्णालयातच उपचार सुरु आहेत. त्यांना आज सकाळी अकरा वाजता शार पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी दिली.

असे असतानाच शरद पवार यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार नसल्याची माहिती आता समोर आली. शरद पवार यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी वृत्तवाहिनीशी बोलताना या संदर्भात माहिती दिली. शरद पवार यांना बरे होण्यासाठी आणखी 1 ते 2 दिवस लागतील अशी माहिती डॉक्टरांनी दिली. दरम्यान उद्यापासून राष्ट्रवादीचे शिबिर सुरू होणार आहे. या शिबिराला शरद पवार मार्गदर्शन करणार होते. अजूनही त्यांना पूर्णपणे बरे होण्यासाठी 2 दिवस लागतील त्यामुळे त्यांना उद्या डिस्चार्ज मिळण्याची शक्यता कमी आहे.

- Advertisement -

शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याने आणि त्यांना बरे होण्यासाठी आणखी 1 ते 2 दिवस लागणार असल्याने ते राष्ट्रवादीच्या शिबिराला उपस्थित राहू शकणार नाहीत. शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात ते उपचार घेत आहेत.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 4 आणि 5 नोव्हेंबर 2022 रोजी शिर्डी येथे राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी “राष्ट्रवादी मंथन : वेध भविष्याचा” या दोन दिवसीय अभ्यास शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात शरद पवार उपस्थित राहून कृषी, विज्ञान, अर्थ, संरक्षण, पत्रकारिता आदी क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. या शिबिरामध्ये शरद पवार यांच्यासह विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, खा. सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते देखील मार्गदर्शन करणार आहेत.

- Advertisement -

शरद पवारांना प्रकृतीच्या कारणास्तव ब्रीच कँडी रुग्णालयात केले दाखल
असे पत्रक राष्ट्रवादीकडून काढण्यात आले होते. पण आता शरद पवार यांना बरे होण्यासाठी आणखी १ ते २ दिवस लागणार आहेत असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले दरम्यान राष्ट्रवादीच्या शिबिराला शरद पवार प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार होते. पण आता हे शिबीर होणार की नाही यासंदर्भातही संभ्रम आहे.


हे ही वाचा – महाराष्ट्रात अगणित रोजगार निर्माण होतील, प्रकल्पांची माहिती देत नरेंद्र मोदींचं तरुणांना आश्वासन

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -