घरक्रीडासचिन तेंडुलकरचा शंभर शतकांचा विक्रम विराट कोहली मोडू शकेल -पठाण

सचिन तेंडुलकरचा शंभर शतकांचा विक्रम विराट कोहली मोडू शकेल -पठाण

Subscribe

भारताचा कर्णधार विराट कोहली महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतकांचा विक्रम मोडू शकतो, असे भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाणला वाटते. ३१ वर्षीय विराट सध्याच्या घडीला क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत मिळून जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७० शतके (वनडेत ४३, कसोटीत २७) केली आहेत. तो खूप फिट असून बरीच वर्षे क्रिकेट खेळेल. त्यामुळे त्याला सचिनचा विक्रम मोडण्याची संधी आहे, असे पठाण म्हणाला.

आणखी ३० शतकांची आवश्यकता

विराट कधीही १०० शतके करण्याविषयी बोलत नाही. मात्र, सचिन तेंडुलकरनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतके करण्याची कोणत्या फलंदाजात क्षमता असेल, तर तो विराट कोहली आहे. विराटने कमी कालावधीतच, खूप यश मिळवले आहे. सचिनचा १०० शतकांचा विक्रम जर कोणी मोडणार असेल, तर तो भारतीय फलंदाज असावा अशी माझी इच्छा आहे. विराटमध्ये १०० शतके करण्याची क्षमता नक्कीच आहे. तसेच इतकी शतके करायची म्हणजे फिटनेस महत्त्वाचा आहे आणि विराट खूप फिट आहे. त्यामुळे त्याला सचिनचा विक्रम मोडण्याची संधी आहे. त्याला आणखी ३० शतकांची आवश्यकता आहे, असे पठाणने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -