घरक्रीडाविराट टाकणार धोनीला मागे?

विराट टाकणार धोनीला मागे?

Subscribe

भारताचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात विक्रम प्रस्थपित केला. भारताने हा सामना ३१८ धावांनी जिंकला होता. विराटच्या नेतृत्वात परदेशात कसोटी सामना जिंकण्याची ही भारताची बारावी वेळ होती. त्यामुळे सौरव गांगुलीला (११) मागे टाकत तो परदेशातील भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार झाला आहे. आता शुक्रवारपासून सुरू होणार्‍या विंडीजविरुद्धच्या दुसर्‍या कसोटीत विराटला आणखी एक विक्रम करण्याची संधी आहे.

विराटच्या नेतृत्वात भारताने आतापर्यंत २७ कसोटी सामने जिंकले आहेत. भारताने दुसरा कसोटी सामना जिंकल्यास विराट हा महेंद्रसिंग धोनीला मागे टाकत भारताचा कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार होईल. धोनीच्या नेतृत्वातही भारताने २७ कसोटी सामने जिंकले आहेत. धोनी कर्णधार असताना भारताने ४५ टक्के कसोटी सामने जिंकले होते, तर १८ सामने सामने गमावले आणि १५ सामने अनिर्णित राहिले.

- Advertisement -

कोहलीच्या नेतृत्वात भारताने आतापर्यंत ४७ पैकी २७ म्हणजेच ५५.३० टक्के कसोटी सामने जिंकले आहेत. धोनी कसोटीतून निवृत्त झाल्यानंतर २०१४ साली विराटची कर्णधारपदी निवड झाली. तो कर्णधार असतानाच भारताला पहिल्यांदा (२०१८) ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकण्यात यश आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -