घरक्रीडाआम्ही देशासोबत,निर्णय आम्हाला मान्य

आम्ही देशासोबत,निर्णय आम्हाला मान्य

Subscribe

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर कोहलीची स्पष्ट भूमिका

पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळवल्या जाणार्‍या विश्वचषकातील क्रिकेट सामन्याला मोठ्या प्रमाणात विरोध होत असताना भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोहलीने प्रसार माध्यमांना सामोरे जाताना याबाबत आपले मत व्यक्त केले आहे.‘पुलवामा येथे जे काही घडले, ते खूपच वेदनादायी होते. संपूर्ण संघ शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आहे. आम्ही देशासोबत आहोत… त्यामुळे वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध खेळायचे की नाही, याचा निर्णय सरकार घेईल. सरकार व बीसीसीआय यांचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल.‘भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी कसून सराव करत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेतील पहिला सामना रविवारी विशाखापट्टणम येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्याच्या पूर्वसंध्येला कोहलीने प्रसार माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर दिले.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशात पाकिस्तानविरुद्ध संतापाची लाट अधिक तीव्र झाली आहे. या भ्याड हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा निषेध म्हणून भारताने शेजारील राष्ट्राशी सर्व संबंध तोडून टाकावेत अशा भावना देशवासीय व्यक्त करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या हल्ल्याला जशासतसे उत्तर देण्याची भाषा केली आहे. पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्यासाठी भारताने त्यांच्याशी आयात-निर्यात व्यवहारही बंद केले आहेत. या दोन देशांना क्रिकेटने नेहमी जोडले आहे.दोन्ही देशांतील क्रिकेट सामने मैदानावर जेवढे चुरशीचे असतात तेवढेच मैदानाबाहेरही ते तेवढीच त्याची चर्चा होत असते. परंतु, पुलवामा हल्ल्यानंतर देशवासियांमध्ये प्रचंड संताप असून आता क्रिकेट सामनाही नको, असा ठाम मतप्रवाह निर्माण होत आहे. त्यामुळेच आगामी विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालावा अशी मागणी होत आहे. या मागणीला भारताच्या माजी खेळाडूंनी पाठींबा दर्शविला आहे, तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) चेंडू सरकारच्या कोर्टात टोलवला आहे.

- Advertisement -

बीसीसीआयचे वागणे बालिशपणाचे                                                                                  बीसीसीआय आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व देशांच्या मदतीची अपेक्षा करत पाकिस्तानला एकटे पाडण्याच्या तयारीत आहे. मात्र, भारताचे आरोप हे चुकीचे असून, बीसीसीआयचे वागणे बालिशपणाचे असल्याचे वक्तव्य पाकचा माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदादने केले आहे. बीसीसीआयचे वागणे हे अतिशय बालिशपणाचे आहे. आयसीसी या मागणीला अजिबात विचारात घेणार नाही. आयसीसीशी संलग्न प्रत्येक देशाला महत्वाच्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचा अधिकार आहे. असोसिएट प्रेसशी बोलत असताना मियाँदादने आपले मत मांडले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -