घरक्रीडावेस्ट इंडिज जोमात पाकिस्तान कोमात; पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव

वेस्ट इंडिज जोमात पाकिस्तान कोमात; पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव

Subscribe

पाकिस्तानने १०६ धावांचे माफक आव्हान वेस्ट इंडिजला दिले होते. वेस्ट इंडिजने ते सहज पूर्ण केले. त्यामुळे पहिल्याच सामन्यात पाकिस्तानवर नामुष्किची वेळ आली. वेस्ट इंडिजच्या आक्रमक गोलंदाजांपुढे पाकिस्तानची पळता भुई थोडी झाली. त्यामुळे अवघ्या २२ षटकांमध्ये पाकिस्तानचे सर्व गडी तंबूत परतले.

विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव झाला आहे. वेस्ट इंडिजने ७ गडी राखत पाकिस्तानवर मात केली. विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज दुसरा सामना खेळला गेला. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजचा हाच निर्णय पाकिस्तानला घातक ठरला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्य पाकिस्तानवर विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी नामुष्कीची वेळ आली आहे. कारण वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांच्या आक्रमक आणि प्रभावी माऱ्यापुढे पाकिस्तानच्या फलंदाजांची पळता भुई थोडी झाली. इंडिजच्या गोलंदाजांपुढे पाकिस्तानचे फलंदाज फार काही मोठी कामगिरी करु शकले नाहीत. काही विशिष्ट धावांच्या अंतरावर पाकिस्तानचे एकामागेएक गडी तंबूत परतले. त्यामुळे पाकिस्तानचा संघ २२ षटकांत फक्त १०५ धावांपर्यंत मजल मारु शकला.

पाकिस्तानने दिलेल्या १०६ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर ख्रिस गेलने ३४ चेंडूत ५० धावा केल्या. त्यानंतर शाई होप्पे आणि ब्रावो स्वस्तात तंबूत परतले. परंतु, पुरनने डाव सावरला. त्याने १९ चेंडूत ३४ धावा करत विजयाचा झेंडा फडकवला. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी देखील महत्त्वपूर्ण कामगिरी केली. ओशाने थोमसने ४ विकेट घेतल्या. जेसन होल्डरने ३ विकेट घेतले. तर आंद्रे रसेलने २ विकेट घेतले. तर शेल्डोनने १ विकेट घेतली.

- Advertisement -

पाकिस्तानचा सलामीवीर इमाम-उल-हख अवघ्या दोन धावांवर बाद झाला. त्याने ११ चेंडू खेळले. यानंतर फखर झमन आणि बाबर आझम यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, वेस्ट इंडिजचा गोलंदाज आंद्रे रसेलने ही जोडी फोडली. रसेलने फखरचा त्रिफळा उडवला. फखरने १६ चेंडूत २२ धावा केल्या. यामध्ये त्याने २ चौकार आणि १ षटकार लगावला. यानंतर बाबर आझमही मोठा फटका मारण्याच्या गडबडीत झेलबाद झाला. त्याने २२ चेंडूत ३३ धावा केल्या. यामध्ये त्याने २ चौकार लगावले. यानंतर हरीस सोहील आणि सर्फराज अहमद देखील काही धावांच्या अंतरावर स्वस्तात तंबूत परतले. दोघांनी प्रत्येकी आठ धावा केल्या. मोहम्मद हफीजने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, जोडीदाराची हवी तशी साथ त्याला लाभली नाही. त्याने २४ चेंडूत १६ धावा केल्या. त्यानंतर एकामोगमाग इमद वासिम, शदाब खान आणि हसन अली बाद झाले. सरते शेवटी वाहब रिआझने दोन षटके आणि एक चौकार लावत पाकिस्तानला शंभरी गाठून दिली. मात्र त्याचाही त्रिफळा उडाला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -