रोहितला भारतीय संघात स्थान न देण्याचे कारण काय?

भारतीय संघ लवकरच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असून तीन टी-२०, तीन एकदिवसीय आणि चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या तिन्ही मालिकांसाठी नुकताच भारताचा संघ जाहीर झाला. एकदिवसीय आणि टी-२० संघाचा उपकर्णधार रोहित शर्माचा तिन्ही संघात समावेश नव्हता. रोहितला दुखापत झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची शक्यता आहे. रोहित सध्या सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेच्या काही सामन्यांना मुकला असला तरी तो नेट्समध्ये सराव करताना दिसत आहे. मग असे असतानाही त्याला भारतीय संघात स्थान न देण्यामागे नक्की काय कारण असू शकेल यावर केलेली चर्चा.