घरक्रीडाWI vs ENG 1st Test : जॉनी बेअरस्टोच्या शतकामुळे इंग्लंडचा डाव सावरला,...

WI vs ENG 1st Test : जॉनी बेअरस्टोच्या शतकामुळे इंग्लंडचा डाव सावरला, वेस्ट इंडिजला 6 गडी बाद करण्यात यश

Subscribe

इंग्लंडचा स्टार फलंदाज जॉनी बेयरस्टोने आपल्या शतकीय खेळीमुळे संघाला वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत पहिल्या कसोटीमध्ये पुनरागमन करता आले. इंग्लंडने पहिल्या दिवसाचा सामना संपेपर्यंत ६ विकेट २६८ धावा केल्या. इंग्लंडचा संघ ४ विकेट ४८ धावांवर होता पंरतु अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स आणि बेयरस्टोच्या भागिदारीमुळे संघाला उभारी मिळाली आणि धावसंख्या १०० वर गेली. स्टोक्स ९५ चेंडूत ३६ धावा करुन बाद झाल्याने संघाला ११५ धावांवर ५ वा झटका बसला.

इंग्लंडच्या संघाची आघाडीच्या खेळाडूंनी खराब प्रदर्शन केलं. १६ षटकांमध्ये एकूण ४ फलंदाज माघारी परतले होते. यानंतर जॉनी बेयरस्टो आणि बेन स्टोक्सने संघाला संकटातून बाहेर काढले. दोघांनी ६७ धावा करुन संघाला बळकटी दिली आणि पुनरागमन करण्याचा मार्ग मोकळा केला. बेयरस्टोने विकेटकीपर फलंदाज बेन फॉक्ससोबत ९९ धावांची भागिदारी करुन संघाला २०० धावांवर पोहोचवले. त्याने आपले ८ वे शतक पूर्ण केले आहे.

- Advertisement -

पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बेयरस्टो २१६ चेंडूवर चौकारांच्या मदतीने १०९ धावांवर खेळत होता. क्रिस वोक्ससोबत ५४ धावांची भागिदारी केली. वोक्स २४ धावांवर खेळत होता. वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज जेसन होल्डरने १६ षटकांमध्ये १५ धावा देत २ गडी बाद केले. त्याने आपल्या स्पेलमध्ये ९ मेडन षटकार टाकले.

जेडन सील्सने स्टोक्स आणि क्रॉली या दोघांची विकेट घेतली तर केमार रोचने जो रूट आणि अॅलेक्स लीसला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. रुटने अनुकूल खेळपट्टीवर नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु फलंदाज वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजांचा सामना करु शकले नाहीत. सलामीवीर लीस आणि जॅक क्रॉली 4 षटकांत बाद झाले.

- Advertisement -

कर्णधार जो रुट बाद झाला तेव्हा संघाचा स्कोर २७ धावा झाल्या होत्या डैन लॉरेंस बाद झाला तेव्हा धावसंख्या ४ विकेटवर ४८ होती. यानंतर बेयरस्टो आणि स्टोक्स सांभाळून खेळत होता. स्टोक्स ९५ चेंडूत ३६ धावा करुन बाद झाला. स्टोक्सने ४ चौकार तर फोक्सने ८७ चेंडूत ८ चौकार मारत ४२ धावा केल्या.


हेही वाचा : IPL 2022: चेन्नई सुपर किंग्जला धक्का, 14 कोटींचा वेगवान गोलंदाज सुरुवातीच्या मोसमातून बाहेर

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -