घरक्रीडाभारत अरुण गोलंदाजी प्रशिक्षकपदी रहाणार कायम?

भारत अरुण गोलंदाजी प्रशिक्षकपदी रहाणार कायम?

Subscribe

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) काही दिवसांपूर्वी पुरुषांच्या संघासाठी मुख्य प्रशिक्षकांसह सहाय्यक प्रशिक्षकपदासाठी नव्याने अर्ज मागवले आहेत. सहाय्यकांपैकी गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण हे आपले पद कायम राखण्याची शक्यता आहे. संजय बांगर मात्र फलंदाजी प्रशिक्षकपदी कायम राहण्याची शक्यता फारच कमी आहे.

या दोघांसह मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक श्रीधर यांचा करार विश्वचषकानंतर संपला होता. मात्र, बीसीसीआयने त्यांना विंडीज दौर्‍यापर्यंत वाढीव कालावधी दिला. नवा प्रशिक्षक नेमण्याची जबाबदारी कपिल देव, शांता रंगास्वामी आणि अंशुमन गायकवाड या माजी खेळाडूंच्या समितीवर सोपवण्यात आली आहे.

- Advertisement -

सहाय्यक प्रशिक्षकांपैकी कोण आपले पद राखू शकतात याबाबत माहिती देताना बीसीसीआयच्या एका सिनियर अधिकार्‍याने सांगितले, मागील एक-दीड वर्षात भारत अरुण यांनी गोलंदाजांसोबत खूप मेहनत घेतली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सध्या भारताची गोलंदाजीची फळी ही जगातील सर्वोत्तम म्हणून ओळखली जाते.

मोहम्मद शमी आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्त्कृष्ट गोलंदाजी करत आहे. जसप्रीत बुमराहच्या कामगिरीत सातत्य आहे. याचे श्रेय अरुण यांना दिले पाहिजे. फलंदाजीबाबत बोलायचे तर विराट कोहली आणि रोहित शर्मा हे बांगर येण्याआधीपासून अप्रतिम कामगिरी करत आहेत. मधल्या फळीतील फलंदाजांना तयार करणे हे बांगर यांचे काम होते आणि विश्वचषकात मधल्या फळीला चांगले प्रदर्शन करता आले नाही, हे आपण पाहिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -