घरक्रीडाभारत-न्यूझीलंडच्या सेमीफायनलमध्ये पाऊस पडण्याची दाट शक्यता

भारत-न्यूझीलंडच्या सेमीफायनलमध्ये पाऊस पडण्याची दाट शक्यता

Subscribe

भारताने विश्वचषक स्पर्धेत नऊ सामने खेळले. यापैकी सात सामन्यांमध्ये भारताने यश मिळवले आहे. तर न्यूझीलंड सोबत झालेल्या सामन्यात पावसामुळे सामना अनिर्णयीत ठरला होता. आता पुन्हा पाऊस सेमीफायनल सामन्यात व्यत्यय निर्माण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मंगळवारी विश्वचषक स्पर्धेतील पहिला सेमीफायनल सामना खेळला जाणार आहे. याअगोदरही भारत आणि न्यूझीलंडच्या विश्वचषक सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता. त्यामुळे हा सामना अनिर्णयीत ठरला होता. आता पुन्हा दोन्ही संघ समोरासमोर येणार आहेत आणि त्यात पाऊस पुन्हा व्यत्यय निर्माण करण्याची दाट शक्यता आहे. हा सामना मॅनचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळला जाणार आहे.

ब्रिटन हवामान विभागाने दिली माहिती

ब्रिटन हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी ढगाळ वातावरण असेल. याशिवाय थोड्याफार प्रमाणात पाऊसही पडेल. हा पाऊस थांबून-थांबून पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्टेडिअममधील प्रेक्षकांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. याशिवाय पाऊस पडल्यामुळे सामन्याची रंगत जाण्याची शक्यता असते. त्यामुळे जगभरातील क्रिकेट प्रेमी निराश होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हवामान विभागाच्या या सूचनेवर आयसीसी काय निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

- Advertisement -

सामन्याकडे जगाचे लक्ष्य

भारताने विश्वचषकात नऊ सामने खेळले. यापैकी न्यूझीलंड सोबत खेळला गेलेला सामना हा पावसामुळे अनिर्णयीत ठरला होता. तर इंग्लंड विरोधात खेळताना भारताचा ३१ धावांनी पराभव झाला होता. हे दोन सामने वगळले तर इतर सातही सामन्यांमध्ये भारताने यश मिळवले. त्यामुळे विश्वचषकाच्या गुणतालिकेत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा सामना हा यावर्षीच्या विश्वचषक स्पर्धेतील पहिला सेमीफायनल सामना आहे. या सामन्यात जो जिंकेल तो फायनलमध्ये जाणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे साऱ्या जगाचे लक्ष्य लागले आहे.


हेही वाचा – टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूवर सचिन तेंडुलकर सर्वाधिक खूश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -