घरक्रीडाYuvi चा 'बादशाह' लूक व्हायरल, खेळाडूंसह एक्स गर्लफ्रेंडनीही केली भन्नाट कमेंट

Yuvi चा ‘बादशाह’ लूक व्हायरल, खेळाडूंसह एक्स गर्लफ्रेंडनीही केली भन्नाट कमेंट

Subscribe

रोड सेफ्टी वर्ल्ड टी २० सीरिजमध्ये दमदार कामगिरीमुळे युवराज सिंह सध्या खूप चर्चेत आहे. कारण या सीरिजमध्ये सर्वाधिक षटकार लावणार युवराज सिंह एकमेव खेळाडू ठरला आहे. मात्र युवराज आता पुन्हा एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. क्रिकेटर्स अनेकदा आपल्या लूक, स्टाईलमध्ये बदल करत असतात. यात युवराज सिंहने स्वत:च्या हेअर स्टाईलमध्ये बदल केला आहे.

युवराज सिंहने पहिल्यांदाच लॉन्ग हेअर ठेवत लूक चेंन्ज केला आहे. युवराजने सिंहच्या या नव्या लूकमधील फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. या हटके लूकवर चाहत्यांसह अनेक क्रिकेटर्सनीही भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. त्याने अचानक बदलेला लूक पाहून इतर क्रिकेटपटूदेखील आश्चर्यचकित झाले. अनेक क्रिकेटर्सपासून चाहतेही सध्या युवराजला ट्रोल करत आहेत. प्रसिद्ध हेअरस्टाइलिस्ट आलिम हकीम यांनी ही हेअर स्टाईल केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yuvraj Singh (@yuvisofficial)

- Advertisement -

युवीच्या या हेअरस्टाईलवर रवींद्र जडेजाने कमेंट् करत लिहिले की, युवी पा काय होतास तू काय झालास तू? शिखर धवन यानेही युवराजच्या या लूकवर लिहिले की, बादशाहा दिसतोयस. तर हरभजन सिंह याने लिहिले की, सिरी पाजीची स्टाईल आहे. इरफान पठाननं ‘ब्वॉय बादशाह’ अशी कमेंट केली आहे. रवींद्र जडेजानं क्या थे और क्या हो गये अशी कमेंट केली आहे. इतकेच नाही तर युवराज सिंहची एक्स गर्लफ्रेंडनेही या फोटोवर इमोजी शेअर केली आहे. या फोटोमध्ये युवराज सिंहचे मोठे सुंदर, कर्लस केले आहेत. याआधी युवराज सिंहला आपण छोट्या कुरल्या केसांमध्ये पाहिले आहे. रोड सेफ्टी वर्ल्ड टी -20 मालिकेच्या अंतिम सामन्यात युवराज सिंहने41 चेंडूत 60 धावा केल्या आणि 4 षटकार ठोकण्याचा विक्रमही केला.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -