घरटेक-वेकचीनला पहिला झटका; 'ओप्पो' कंपनीला स्मार्टफोन लाँच कार्यक्रम करावा लागला रद्द

चीनला पहिला झटका; ‘ओप्पो’ कंपनीला स्मार्टफोन लाँच कार्यक्रम करावा लागला रद्द

Subscribe

ओप्पो कंपनीने हा कार्यक्रम का रद्द करावा लागला याबाबत ठोस कारण दिलेले नाही.

भारत-चीन तणावाचा परिणाम आता व्यवसायावर होताना दिसून येत आहे. लोकप्रिय स्मार्टफोन कंपनी ओप्पोला फ्लॅगशिप स्मार्टफोन Find X2 सीरिज भारतात लाँच कार्यक्रम रद्द करावा लागला. गलवान खोऱ्यातील सीमेवर झालेल्या हिंसक चकमकींमध्ये २० भारतीय जवान शहीद झाले आहेत. त्यामुळे देशातील चीनचा विरोध शिगेला पोहोचला आहे. या संघर्षाचा परिणाम दोन्ही देशांच्या व्यवसायावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भारतात ओप्पो स्मार्टफोनचा असेंब्ली प्लांट आहे. कंपनीने जाहीर केले आहे की, ‘आपल्या कंपनीचा नवीन Find X2 सीरिजचा स्मार्टफोन लाईव्ह लाँच करेल. पण हा लाँच कार्यक्रम बुधवारी सायंकाळी ४ वाजता झाले. या कार्यक्रमाचे लाईव्ह स्ट्रीमिंग एक युट्यूब लिंकवर होणार होते. पण लाँचिंग करण्याऐवजी कंपनीने एक २० मिनिटांचा प्री रेकॉर्डेड व्हिडिओ टाकला. ज्यामध्ये सांगितले की, कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी ओप्पोने कसे काम केले आहे हे स्पष्ट केले.’

- Advertisement -

भारतीय बाजारपेठेत ओप्पो कंपनीची १०.७ टक्के भागीदारी आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, ‘कंपनीने लाईव्ह लाँच कार्यक्रम का रद्द केला? याबाबत काही स्पष्ट केलेले नाही. परंतु कंपनीच्या सुत्रांचे म्हणणे आहे की, सध्याचे तणावच वातावरण लक्षात घेऊन सोशल मीडियावर कोणत्याही प्रतिक्रियापासून वाचण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.’

सीमेवर हा तणाव होण्यापूर्वीच भारताने एफडीआयचे नियम कठोर केले होते. त्यामुळे आता चीनकडून येणाऱ्या प्रत्येक गुंतवणूकीची बारकाईने तपासणी केली जाईल. चिनी ग्राहकांना सल्ला देणारे लॉ फर्म फिनिक्स लीगलचे सह-संस्थापक अभिषेक सक्सेना म्हणाले की, ‘सध्या सरकार कठोर वृत्ती स्वीकारत आहे. मला वाटत नाही की आता कोणत्याही चिनी गुंतवणूकीच्या प्रस्तावाला घाई होईल.’

- Advertisement -

देशातील चीन विरोधी वातावरण शिगेला पोहोचले आहे. छोट्या आणि किरकोळ व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनेही चिनी मालावरील बहिष्काराची घोषणा करत अशा वस्तूंची यादी जाहीर केली आहे. पुढच्या वर्षापर्यंत चीनला एक लाख कोटी रुपयांचे नुकसान करण्याचा संघटनेचा मानस आहे.

यापूर्वी कंपनी बुधवारी देशात Oppo Find X2 आणि Oppo Find X2 Pro हे दोन फोन बाजारत आणले, अशी अपेक्षा होती. हे दोन फोन मार्च महिन्यात युरोपमध्ये लाँच करण्यात आले होते. Oppo Find X2 सीरिजमध्ये 120Hz अल्ट्रा व्हिजन डिस्प्ले आणि होल-पंच डिझाईन दिली आहे. Find X2 Pro मध्ये एक प्रीमियम मॉडेल आहे. ज्यामध्ये 60X डिजिटल झूमचा सपोर्ट आहे.


हेही वाचा – चीनमध्ये नाही तर SAMSUNG ला करायची आहे भारतात गुंतवणूक!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -