घरदेश-विदेश...आता तुम्ही दिल्लीत आहात, शिवसेनेने करुन दिली 'त्या' भाषणाची आठवण

…आता तुम्ही दिल्लीत आहात, शिवसेनेने करुन दिली ‘त्या’ भाषणाची आठवण

Subscribe

चीनच्या हल्ल्यावर प्रतिकार झालाच नाही तर मोदींच्या प्रतिमेस धक्का बसेल

भारत आणि चीन सीमेवर झालेल्या हिंसक चकमकीमुळे राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. भारताच्या हद्दीत घुसून चीनने जो हल्ला केला तो एक इशारा आहे. दिल्लीत बैठका आणि चर्चा सुरू आहेत . तणाव कोणालाच नको आहे. सध्याच्या काळात तो कोणालाच परवडणारा नाही, पण २० जवानांचे बलिदान वाया जाऊ द्यायचे काय? प्रतिकार झालाच नाही तर मोदींच्या प्रतिमेस धक्का बसेल म्हणत मोदींवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून निशाणा साधण्यात आला आहे.

चीनबरोबर जो संघर्ष आज सुरू आहे त्याचे कूळ आणि मूळ पंडित नेहरूंच्या फसलेल्या परराष्ट्र धोरणात आहे असं जाहीर सभांतून सांगितल्याने टाळ्या मिळतील. पण आज जवानांची बलिदाने सुरू आहेत ती थांबवण्याची जबाबदारी मोदी सरकारचीच आहे. “गडबड सीमेवर नसून दिल्लीत आहे. दिल्लीची सरकारे नामर्द आहेत म्हणून सीमेवर शत्रू अरेरावी करतो,” असं सहा वर्षांपूर्वी जोरकसपणे सांगणारे नरेंद्र मोदी आज दिल्लीचे सर्वसत्ताधीश आहेत. त्यामुळे आज जे घडले आहे त्याचा प्रतिकार मोदींनाच करावा लागेल, असा टोला लगावत पंतप्रधान मोदींना त्यांच्या भाषणाची आठवण करुन दिली.

- Advertisement -

हेही वनाचा – ट्रम्प यांनी निवडणूक जिंकण्यासाठी मागितली होती चीनकडे मदत


चीनचे राष्ट्राध्यक्ष अहमदाबादला येऊन पंतप्रधान मोदींच्या झोपाळ्यावर ढोकळा खात बसले तेव्हाही याच स्तंभातून आम्ही इशारा दिलाच होता. “चिनी लाल माकडांवर विश्वास ठेवू नका! पंडित नेहरूंचा विश्वासघात झाला तसा तुमचाही होईल.” दुर्दैवाने तो झाला आहे. पाकिस्तानला दम देणे, धमक्या आणि इशारे देणे, सर्जिकल स्ट्राइक करून राजकीय माहोल बनवणे सोपे आहे. कारण पाकिस्तान हा देश नसून टोळी आहे, पण चीनचं तसं नाही आहे. अमेरिकेसारख्या मस्तवाल महासत्तेलाही न जुमानणाऱ्या चीनची स्वत:ची एक जागतिक फळी आहे. चीन साम्राज्यवादी आणि घुसखोर आहे. त्याने भारतावरवर आधीच अतिक्रमण केले आहे. लडाखच्या भारताच्या हद्दीत घुसून चीनने जो हल्ला केला तो एक इशारा आहे. प्रतिकार झालाच नाही तर मोदी यांच्या प्रतिमेस त्यामुळे धक्का बसेल, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -