घरटेक-वेकखुशखबर! खुशखबर! इन्स्टाग्राम युजर्ससाठी खुशखबर!!!

खुशखबर! खुशखबर! इन्स्टाग्राम युजर्ससाठी खुशखबर!!!

Subscribe

इन्स्टाग्राम युजर्सना आता एक तासापर्यंतचा व्हिडीओ अपलोड करता येणार आहे. कंपनीच्या वतीने नुकतीच तशी घोषणा करण्यात आली.

इन्स्टाग्राम युजर्ससाठी आता नवीन फिचर आणण्याचा निर्णय इन्स्टाग्रामने घेतला आहे. या नवीन फिचरच्या मदतीने तुम्ही तब्बल एक तासापर्यंतचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड करू शकणार आहात. जगभरात व्हिडीओ शेअरिंगची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. ही बाब लक्षात घेत इन्टाग्राम कंपनीचे सीईओ केव्हीन सिस्ट्राम यांनी युजर्ससाठी नवीन व्हिडीओ सुविधा देत असल्याचे जाहीर केले. आत्तापर्यंत इन्स्टाग्रामवर केवळ ६० सेकंदाचा व्हिडीओ अपलोड करता येत होतो. पण, नवीन फिचरमुळे एक तासापर्यंतचा व्हिडीओ अपलोड करता येणार आहे. यासाठी आयजीटिव्ही नावाने वेगळे फिचर असून ते इन्स्टाग्राममध्ये इनबिल्ट असेल देण्यात आले आहे. व्हिडीओ अपलोड करण्यासाठी कोणतेही वेगळे अॅप नसेल हे विशेष!

कसे असेल नवीन फिचर?

इन्स्टाग्राममधील नवीन फिचरच्या मदतीने एक तासापर्यंत व्हिडीओ अपलोड करता येणार आहे. अपलोड केलेले व्हिडीओ हे मेन फिडमध्ये व्हर्टीकल अवस्थेत दिसणार आहेत. सध्या स्मार्टफोनच्या मदतीने व्हिडीओ शुट आणि अपलोड केले जातात. त्यामुळे हॉरिझंटल पेक्षा व्हर्टीकल व्हिडीओंना जास्त प्राधान्य देण्यात आले आहे. यावेळी सेलिब्रेटींच्या व्हिडीओला जास्त प्राधान्य देण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. इन्स्टाग्रामचे नवीन फिचर हे आयओएस आणि अॅड्राईड या दोन्ही मोबाईलवर उपलब्ध होणार आहे.

- Advertisement -

इन्स्टाग्रामने ओलांडला १ अब्ज युजर्सचा टप्पा

इन्स्टाग्रामची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. इन्स्टाग्रामने नुकताच एक अब्ज युजर्सचा टप्पा ओलांडला असल्याची माहिती यावेळी कंपनीकडून देण्यात आली. यावरूनच इन्स्टाग्रामची लोकप्रियता लक्षात येते. सध्या व्हिडीओसाठी इन्स्टाग्रामला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. त्यामुळे एक तासाचा व्हिडीओ अपलोड करण्याचे फिचर आल्यानंतर इन्स्टाग्रामच्या लोकप्रियतेत आणखीन भर पडेल हे नक्की!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -