Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर टेक-वेक Microsoftने Windows 365 केले लाँच; कम्प्युटिंगचे नवे फिचर्स वाचा

Microsoftने Windows 365 केले लाँच; कम्प्युटिंगचे नवे फिचर्स वाचा

Related Story

- Advertisement -

मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने विंडोज ३६५ (Windows 365) या क्लाऊड सेवेची घोषणा केली आहे. यामुळे सर्व आकारातील व्यवसायांना विंडोज १० आणि विंडोज ११चा नव्या स्वरुपातील अनुभव घेता येईल. विंडोज ३६५ मुळे ऑपरेटिंग सिस्टम मायक्रोसॉफ्ट क्लाऊडवर नेली जाते. यातून वैयक्तिक आणि कॉर्पोरेट डिव्हाईसेसना Apps, डेटा आणि सेटिंग्जमध्ये परिपूर्ण विंडोज अनुभव मिळू शकेल. डिझाइनमधून सुरक्षितता देत झिरो ट्रस्टच्या तत्वांवर निर्माण करण्यात आलेल्या विंडोज ३६५ मध्ये सर्व माहिती सुरक्षितरित्या डिव्हाइसऐवजी क्लाऊडवर साठवली जाते. त्यामुळे इंटर्न्स ते काँण्ट्रॅक्टर्स ते सॉफ्टवेअर डेव्हलपर्स आणि इंडस्ट्रिअल डिझाइनर्सपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षित आणि निर्मितीक्षम अनुभव मिळतो. विंडोज ३६५मध्ये क्लाऊड पीसी हा नवा हायब्रिड पर्सनल कम्प्युटिंग विभागही तयार करण्यात आला आहे. यात क्लाऊडची ताकद आणि डिव्हाइसच्या क्षमता अशा दोहोंच्या वापरातून परिपूर्ण, वैयक्तिक असा विंडोज अनुभव दिला जातो. ऑन-साइट आणि जगभरात सर्वत्र विखुरलेल्या कर्मचाऱ्यांसोबत काम करण्यासाठी सर्वोत्कृष्ट हायब्रिड वर्क मॉडेल्सचा शोध सध्या जगभरातील संस्था घेत असताना ही घोषणा म्हणजे फार महत्त्वाची घडामोड आहे.

“विंडोज ३६५सह आम्ही क्लाऊड पीसी हा नवा विभाग तयार केला आहे,” असे मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष आणि सीईओ सत्या नाडेला म्हणाले.” SaaSच्या माध्यमातून Application क्लाऊडवर आणले गेले. त्याचप्रमाणे आता आम्ही ऑपरेटिंग सिस्टम क्लाऊडवर आणून संस्थांना अधिक लवचिकता आणि त्यांचे कर्मचारी अधिक उत्पादनक्षम व्हावेत, त्यांना कुठूनही अधिक चांगल्या प्रकारे इतरांशी कनेक्ट होता यावे यासाठी एक सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देत आहोत.”

हायब्रिड कामकाजासाठी नव्या स्वरुपातील कम्प्युटिंग

- Advertisement -

कामाची नवी पद्धत आता उदयास येत आहे आणि कर्मचाऱ्यांना विविध ठिकाणी आणि डिव्हाईसेसवर कॉर्पोरेट रीसोर्सेस वापरावी लागतात. तशातच सायबर सुरक्षेतील धोके वाढत असताना ही स्रोते सुरक्षित ठेवणे फार आवश्यक आहे.
“हायब्रिड कार्यपद्धतीने सध्याच्या संस्थांमधील तंत्रज्ञानाची भूमिकाच बदलून टाकली आहे,” असे मायक्रोसॉफ्ट ३६५चे कॉर्पोरेट उपाध्यक्ष जॅरेड स्पॅटॅरो म्हणाले. “कर्मचाऱ्यांचे स्वरूप कधी नव्हे इतके बदलल्याने संस्थांना अधिक बहुविधता, सहजता आणि सुरक्षेसह उत्तम उत्पादक अनुभव देण्यासाठी नवे मार्ग आवश्यक झाले आहेत. क्लाऊड पीसी हा आकर्षक, हायब्रिड पर्सनल कम्प्युटिंगचा नवा विभाग आहे. यामुळे कोणत्याही डिव्हाइसला वैयक्तिक, उत्पादक आणि सुरक्षित डिजिटल वर्कस्पेस म्हणून वापरता येऊ शकते. डिव्हाइस आणि क्लाऊडमधील फरक आम्ही पुसून टाकण्याचा प्रयत्न करत असताना पुढे काय शक्य होऊ शकते याची सुरुवातीची एक झलक आजच्या विंडोज ३६५ च्या घोषणेतून दिसली आहे.”
जागतिक महासंकटाच्या आधीपासून कंपन्यांना जी आव्हाने भेडसावत होती ती सोडवण्यात विंडोज ३६५चे साह्य लाभते. कर्मचाऱ्यांना विविध ठिकाणांहून काम करण्याचे विविध पर्याय आणि अधिक लवचिकता यातून मिळते. तसेच संस्थेचा सगळा डेटा सुरक्षित असल्याची खातरजमाही होते. तात्पुरत्या कर्मचाऱ्यांना नवे हार्डवेअर किंवा वैयक्तिक डिव्हाइस सुरक्षित ठेवण्याच्या कोणत्याही लॉजिस्टिक समस्यांशिवाय टीमचा भाग बनता येईल, त्यातून बाहेर पडता येईल. त्यामुळे अधिक कामाच्या काळातही कंपन्यांना अधिक परिणामकारकपणे आणि सुरक्षितपणे काम करता येईल. तसेच कंपन्यांना अगदी सहजपणे क्रीएटिव्ह, Analytics , इंजिनीअरिंग किंवा सायंटिफिक कामांसाठी कौशल्यपूर्ण कर्मचाऱ्यांना अधिक चांगल्या कम्प्युटर क्षमता आणि त्यांना हव्या असलेल्या महत्त्वाच्या Applicationचा सुरक्षित Access देता येईल.

बहुआयामी, साधे, सुरक्षित: विंडोज ३६५चा बदलात्मक परिणाम

• दमदार – आपल्या पर्सनल क्लाऊड पीसीला तात्काल ऑन बुट देत वापरकर्त्यांना त्यांचे सर्व Applications, टुल्स, डेटा आणि सेटिंग्ज क्लाऊडवरून कोणत्याही डिव्हाईसवर स्ट्रीम करता येतील. विंडोज ३६५मुळे क्लाऊडवर पूर्ण पीसी अनुभव मिळतो.

- Advertisement -

• साधे – क्लाऊड पीसीसह वापरकर्त्यांना लॉग इन करून त्यांनी वेगळ्या डिव्हाइसवर जिथे काम सोडलं होतं तिथून सुरू करता येतं. यातून क्लाऊडवर साधा आणि ओळखीचा विंडोज अनुभव मिळतो. आयटीसाठीही विंडोज ३६५ मध्ये डिप्लॉयमेंट, अपडेट्स आणि मॅनेमजमेंट सोपे होते. शिवाय, इतर पर्यायांप्रमाणे विंडोज ३६५ मध्ये कोणत्याही प्रकारचा व्हर्च्युअलायझेशन अनुभव आवश्यक नसतो. छोट्या आणि मध्यम आकाराच्या व्यवसायांना विंडोज ३६५ थेट किंवा क्लाऊड सर्विस प्रदातामार्फत घेता येईल आणि फक्त काही क्लिक्समध्ये त्यांच्या संस्थेत क्लाऊड पीसीची सुरुवात करता येईल.

• सुरक्षित – विंडोज ३६५ डिझाइनने सुरक्षित करण्यात आले आहे. यात क्लाऊडची ताकद आणि झिरो ट्रस्टचे मूळ तत्व अंगिकारण्यात आले आहे. यामुळे माहिती डिव्हाइसऐवजी क्लाऊडवर सुरक्षितरित्या साठवली जाते. कायम अपटूडेट असणाऱ्या आणि मायक्रोसॉफ्टच्या संपन्न सुरक्षा क्षमता आणि बेसलाइनवर उभारलेल्या विंडोज ३६५ मुळे सुरक्षा अगदी सहज मिळते आणि पर्यावरणाच्या दृष्टीने सर्वोत्कृष्ट सुरक्षा सेटिंग्ज तुमच्या हाती उपलब्ध होतात.

- Advertisement -