घरमुंबईSushant Case : रिया शवगृहात गेली कशी?; मानवाधिकार आयोगाने बजावली नोटीस

Sushant Case : रिया शवगृहात गेली कशी?; मानवाधिकार आयोगाने बजावली नोटीस

Subscribe

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी आता सीबीआयची टीम तपास करत आहे. सुशांतचे मित्रपरिवार तसेच त्यांच्या संपर्कातील लोकांची चौकशी केली जात आहे. या प्रकरणी दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. त्यामुळे रिया चक्रवर्तीच्या गळ्याभोवतीचा फास आणखीनच घट्ट होत चालला आहे. दरम्यान, सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह कूपर हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी नेण्यात आला होता. तेथील शवगृहात त्याला ठेवण्यात आले आहे. तेव्हा रिया चक्रवर्तीदेखील शवगृहात केली होती. मात्र रियाला शवगृहात जाण्याची परवानगी दिलीच कशी, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. याकरता महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने रियाला कूपर रुग्णालयाच्या शवगृहात प्रवेश करण्यास परवानगी मिळाल्याबद्दल कूपर हॉस्पिटल तसेच मुंबई पोलिसांना नोटीस पाठविली आहे. तसेच रियाला परवानगी मिळालेल्या नियमांचे तपशील ते शोधत आहेत, अशी माहिती मानवाधिकार आयोगाचे अधिकारी एम. ए. सईद यांनी दिली.

- Advertisement -

सीबीआय चौकशीचा आज सहावा आहे. या दरम्यान त्यांनी सुशांतच्या संपर्कातील लोकांची चौकशी केली. सुशांतचा स्वयंपाकी, त्याचा फ्लॅटमेट, सुरूवातीपासून तपास करणारे मुंबई पोलीस यांच्याकडून माहिती घेतली. तसेच सुशांतच्या घरी जाऊन पाहणीदेखील त्यांनी केली आहे. सुशांतने १४ जून रोजी त्याच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. त्याच्या मृत्यूला अडीच महिने उलटले असून या काळात विविध स्तरावर त्याच्या मृत्यूचा तपास करण्यात आला आहे.

हेही वाचा –

महाराष्ट्रातील ३०० पेक्षा अधिक APMC मार्केटचा कडकडीत बंद!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -