घरठाणेलोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू

Subscribe

42 हजार अतिरिक्त पोलिसांची गरज, 18 मतदान केंद्रांवर महिला कर्मचारीच, 65 लाख 1 हजार 671 मतदार हक्क बजावणार

ठाणे । लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 संदर्भात ठाणे जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुक पाचवा टप्पामध्ये ठाणे जिल्हामध्ये 20 मे रोजी होणार आहे. यावेळी 42 हजार अतिरिक्त पोलीस कर्मचारी लागणार असून 18 मतदान केंद्रावर महिला कर्मचारीच कार्यरत असणार आहेत. तसेच जिल्ह्यात 65 लाख 1 हजार 671 एकूण मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असल्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी सांगितले. ठाणे जिल्ह्यात पुरुष मतदार एकूण 35 लाख 6 हजार 83 मतदार आहेत तर महिला मतदार 29 लाख 94 हजार 315 मतदार आहेत तर सैन्य मतदार 1 हजार 595 मतदार आहेत. तृतीय पंथी 15 हजार 422 मतदार, 18 ते 19 वयोगटातील 82 हजार 327 मतदार , 20 ते 29 वयोगटातील 1 लाख 60 हजार 117 मतदार, दिव्यांग 34 हजार 976 मतदार, 85 वर्षा पेक्षा जास्त मतदार 58 हजार 966 मतदार आहेत. जिल्ह्यात एकूण मतदान केंद्र 6 हजार 592 आहेत, सर्वाधिक कमी मतदान केंद्र उल्हासनगर येथे 251 मतदान केंद्र आहेत. तर सर्वाधिक जास्त मतदान केंद्र मुरबाड येथे 511 मतदान केंद्र आहेत. यामध्ये जिल्ह्यात महिला मतदान केंद्र 22 , संवेदनशील मतदान केंद्र 6 , युवा मतदान केंद्र 1 दिव्यांग मतदान केंद्र 18 आहेत
मतदान 20 मे रोजी होणार असून मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे.

एकूण आवश्यक ईव्हीएमची संख्या 15 हजार 821 आहे. टपाली मतदार पत्रिका देखील देण्यात येणार आहे. तसेच निवडणूक विषयक cvigil , voter help line, saksham app, suvidha app, encore app द्वारे मदत देखील उमेदवारांना तसेच नागरिकांना होणार आहे. भिवंडी 23 या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय जाधव, अप्पर जिल्हाधिकारी नवी मुंबई, कल्याण -24 या ठिकाणी सुषमा सातपुते, अतिरिक्त अभियान संचालक, सिडको भवन, ठाणे 25 या ठिकाणी मनीषा जायभाये- धुळे हे पाहणार आहेत. तसेच उमेदवाराला कुणी नागरिकांनी 10 रुपये तरी दिले तरी त्याची परवानगी घेऊनच द्यावे लागणार आहेत, अन्यथा त्याची तक्रार कुणी निवडणूक अधिकारी यांच्याकडे केली तर त्यावर कारवाई होणार आहे. मतदानाचे साहित्य वाटप देखील मतदानाच्या आधी होणार असून शिक्षक यांना तीन दिवसांची सुट्टीच्या दिवशीच मतदानाची ट्रेनिंग देण्यात येत आहे. यामुळे शिक्षक देखील मतदान केंद्रावर आपले कर्तव्य पार पडणार असल्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी, मुख्य भूमी व भूमापन अधिकारी तथा आदर्श आचारसंहिता समन्वय अधिकारी विजयसिंह देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम, ठाणे महानगरपालिकेचे मुख्य वित्त व लेखाधिकारी दिलीप सूर्यवंशी, तहसिलदार प्रदीप कुडळ, तहसिलदार उज्वला भगत आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -