घरठाणेमुंब्य्रात ठाकरे-शिंदे गट आमनेसामने; 500 पोलीस, आरपीएफसह दंगल नियंत्रण पथक तैनात

मुंब्य्रात ठाकरे-शिंदे गट आमनेसामने; 500 पोलीस, आरपीएफसह दंगल नियंत्रण पथक तैनात

Subscribe

उद्धव ठाकरे हे ठाकरे गटाच्या काही नेत्यांसह या पाडलेल्या शाखेच्या ठिकाणाला भेट देणार आहेत. परंतु, त्याआधीच मुंब्य्रातील राजकीय वातावरण हे चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. ज्यामुळे पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

ठाणे : शिवसेनेत फूट पडल्यापासून कायमच शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामध्ये वाद पाहायला मिळत आहे. आता या दोन्ही गटात पुन्हा एकदा नव्या कारणामुळे वादाला सुरुवात झाली आहे. कारण 2 नोव्हेंबरला ठाण्यातील मुंब्रा येथील शंकर मंदिर परिसरात असलेली 22 वर्षे जुनी शाखा पाडण्यात आली होती. शिवसेना ठाकरे गटाच्या मध्यवर्ती शाखेवर बुलडोझर चालवून ती शाखा पाडण्यात आली. ज्यामुळे आता आज (ता. 11 नोव्हेंबर) उद्धव ठाकरे हे ठाकरे गटाच्या काही नेत्यांसह या पाडलेल्या शाखेच्या ठिकाणाला भेट देणार आहेत. परंतु, त्याआधीच मुंब्य्रातील राजकीय वातावरण हे चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. ज्यामुळे पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. (500 police, RPF along with riot control team deployed for Thane visit of Uddhav Thackeray)

हेही वाचा – मुंब्य्रातील वाद आणखी चिघळणार? पाडलेल्या शाखेच्या ठिकाणाला उद्धव ठाकरे देणार भेट

- Advertisement -

मुंब्य्रातील शाखेच्या मुद्द्यावरून आता ठाकरे गट आणि शिंदे गट हे आमनेसामने आले आहेत. सकाळपासून ठाणे, मुंब्रा या भागांत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. आज सकाळी पोलिसांनी उद्धव ठाकरे यांना ठाण्यात येण्यास बंदी घातली होती, त्यासाठी त्यांच्याकडून 144 ची नोटीस लागू करण्यात आली होती. मुंब्य्रातील शाखेचा मुद्दा तापलेला असताना त्यांच्या ठाण्यात येण्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार होईल. यामुळे पोलिसांकडून ही नोटीस लागू करण्यात आली होती. परंतु, त्यानंतर उद्धव ठाकरे यांना बजावण्यात आलेली 144 ची नोटीस रद्द करण्यात आली.

परंतु, उद्धव ठाकरे हे मुंब्य्रात येणार असल्याकारणाने पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून ठाण्यापासून मुंब्य्रापर्यंत मोठा बंदोबस्त ठेवला आहे. मुंब्य्रात 500 हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त, पोलीस सह आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त यांच्या नेतृत्वात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 3 एसआरपीएफच्या तुकड्या, 2 दंगल नियंत्रण पथक, 3 डीसीपी, 9 पोलीस निरीक्षक आणि इतर कर्मचारी अधिकारी यावेळी तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांच्या प्रत्येक टीमला वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -