घरठाणेपरिवहन बस सेवा चाचणी तत्वावर सुरू

परिवहन बस सेवा चाचणी तत्वावर सुरू

Subscribe

नागरिकांनी घेतला मोफत प्रवासाचा आनंद

उल्हासनगर । महापालिका परिवहन ई बस सेवेतील काही अडचणी दूर झाल्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी शहाड रेल्वे स्टेशन ते शिवमंदिर कैलास कॉलनीपर्यंत एक बस चाचणी तत्वावर चालविण्यात आली. यावेळी नागरिकांनी बससेवेचा आनंद घेतला. उल्हासनगर महापालिकेने स्वतःची परिवहन बससेवा अनेक वर्षानंतर सुरू केली. मात्र पहिल्याच दिवशी चार्जिंगमुळे ठप्प पडलेली परिवहन बससेवेची सुरवात मंगळवारी ट्रायलबेसवर सुरू करण्यात आली. सकाळी आणि संध्याकाळी एक बस शहाड रेल्वे स्टेशन ते कॅम्प नंबर पाच कैलास कॉलनी आणि परत कैलास कॉलनी ते शहाड स्टेशन दरम्यान चालवण्यात आली. या सेवेतील प्रवास मोफत होता. यावेळी बसवाहकाने नागरिकांची नावे आणि मोबाईल नंबर घेऊन कोण कोणत्या टप्प्यावर बसमध्ये चढतात याची माहिती घेतली.

बस चार्जिंगची समस्या निकाली निघाली असून पाचही बसेसची चार्जिंग पूर्ण झाल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. तसेच शहाड बस डेपोत काही दिवसात चार्जिंग स्टेशन सुरू होण्याचे संकेत त्यांनी दिले आहे. तसेच महापालिका बस डेपोसह बस स्टॉप, कर्मचारी वर्ग, बस दुरुस्ती रॅम, तिकीट दर,चार्जिंग स्टेशन आदींची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न होत असल्याची माहिती नायकवाडे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -