घरठाणेठाण्यात ठाकरे गटाचे बॅनरद्वारे शिंदे गटाला चोख प्रत्युत्तर

ठाण्यात ठाकरे गटाचे बॅनरद्वारे शिंदे गटाला चोख प्रत्युत्तर

Subscribe

ठाणे : टेंभी नाक्यावर उद्धव ठाकरे टीका करणारे बॅनर लावले असताना, जांभळी नाक्यावर ही शिंदे गटाला चोख प्रत्युत्तर दिले . पण बॅनर लावूनच पण, त्या बॅनर वर बाळासाहेब, उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्यासह आनंद दिघे यांचे तसेच शिवसेनेचा धनुष्यबाण आणि वाघाचा फोटो आहेत. तसेच भगव्याची निष्ठा हीच आमची शान शिवसेनेचे शिलदार म्हणून आम्हाला अभिमान अशा आशयाचे दुसरे बॅनर ही या ठिकाणी लावण्यात आले .

ठाण्यात पहिल्यांदाच शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी राजकीय दहीहंडी शुक्रवारी ठाण्यात पाहण्यास मिळाली. दोन दिवसांपूर्वी विचारे यांनी जांभळी नाक्यावर निष्ठेचे थर लागले जातील असे सांगत शिंदे गटाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर दहीहंडीच्या दिवशी टेंभी नाक्यावर शिंदे गटाने सहा बॅनर लावून थेट उद्धव ठाकरे यांच्यावरच टीका केल्याचे दिसून आले. मात्र दुसरीकडे राजाने विचारे यांनी देखील जांभली नाका परिसरात शिवसेनेच्या निष्ठेविषयी बॅनर लावून त्याला चोख प्रत्युत्तर दिल्याचे दिसून आले. भगव्याची निष्ठा हीच आमची शान शिवसेनेचे शिलदार म्हणून आम्हाला अभिमान, निष्ठेचा थर एकतेचा बाज, संस्कृतीचा साज हिंदुत्वाचा आवाज, अशा आशयाच्या बॅनर ठाणेकरांचे लक्ष वेधून घेत होते.

- Advertisement -

आदित्य ठाकरे यांची आनंद आश्रमाला भेट ; दिघे यांना केले अभिवादन –

युवासेना प्रमुख तसेच शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी जांभळी नाक्यावरील दहीहंडी महोत्सवाला भेट दिली. आदित्य ठाकरे यांनी सुरुवातीला स्व.आनंद दिघे यांच्या आनंदआश्रमाला भेट दिली. तसेच तेथे जाऊन दिघे यांना अभिवादन केले. आनंद आश्रम आदित्य ठाकरे यांनी जांभळी नाक्यावरून गर्दीत पायी गाठले. त्यानंतर स्टेजवर हजेरी वरून गोविंदाचा उत्साह वाढला. आदित्य ठाकरे यांच्या आनंद आश्रम भेटणे ठाण्यातील राजकारणात तर्कवितर्क वर्तवले जात आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले – भास्कर जाधव 

दोन वर्ष कोरोनामुळे आपण हा उत्सव साजरा करू शकलो नाही. कोरोना काळात उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री होते अनेक प्रकारचे टीका झाले आरोप झाले अडचण निर्माण करण्यात आल्या मात्र उद्धव ठाकरे कुठेही विचारलेत नव्हता त्यांनी महाराष्ट्राला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढले गुढीपाडवा शिमगा आणि आज आपण गोकुळाष्टमीचा सण धुमधडाक्यात साजरा करीत आहोत त्याचे कारण उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व गुण हेच मान्य करावे लागेल. असे उद्गार शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी काढले.

जांभळी नाका येथील आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित दहीहंडी महोत्सवाला आमदार जाधव यांनी हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी वरील उद्गार काढत,दिघे यांचा खरा शिष्य राजन विचारे यांचा उल्लेख केला. पुढे बोलताना, श्रीकृष्ण समजून घेणे हे खूप कठीण आहे, ज्यांच्याकडे आपट असे साम्राज्य होते परंतु आपला मित्र सुदामाच्या मैत्रीला जागला असा श्रीकृष्ण अशा आनंद दिघे यांच्या नगरीत आपण उभे आहोत . आनंद दिघे यांचे स्वप्न ,खरा विचार, खरी निष्ठा, खरा प्रामाणिकपणा जर पुढे घेऊन जायचा निर्णय कोणी करत असेल तर राजन विचारे आहेत असे ही जाधव म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -