घरठाणेमुंबई -ठाणे या शहराबाहेर गेलेल्यांना पुन्हा त्याच शहरात युती परत आणण्याचे काम...

मुंबई -ठाणे या शहराबाहेर गेलेल्यांना पुन्हा त्याच शहरात युती परत आणण्याचे काम करणार – मुख्यमंत्री शिंदे

Subscribe

मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकलेला आहे जसा ठाणेकर ठाण्याच्या बाहेर गेलाय, त्याला पुन्हा ठाण्यात आणि त्या मुंबईकरांना परत मुंबईत आणण्याचे काम आपले युती सरकार करणारा असे उद्गार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवरी ठाण्यात काढत, मुंबई प्रमाणे ठाणे देखील सुधारते, बदलते आणि म्हणून मुंबईत देखील जे पुनर्विकासाचे प्रकल्प रखडले आहेत. ते मार्गी लागणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच क्लस्टर आता केवळ ठाणे नाही तर मुंबई, मिरा भाईंदरला ही राबविले जाणार असून त्याची सुरुवात पावसाळ्यानंतर केली जाईल असा विश्वास करताना, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी येथे मध्येही क्लस्टर योजना राबविली जाईल असेही त्यांनी सांगितले. याचदरम्यान निवडणूक आल्या की एकनाथ शिंदे क्लस्टर बाहेर काढतो, पण आता निवडणुका नाहीत पण क्लस्टर सुरू झालेला आहे. असे विधान करत त्यांनी नाव न घेता विरोधकांना टोला लगावला.

देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठी, महत्त्वाकांक्षी व ऐतिहासिक समूह विकास योजना (क्ल्स्टर) या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचा शुभारंभ सोहळा सोमवार ०५ जून रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी त्यांनी वरील वक्तव्य केले. याप्रसंगी केंद्रीय पंचायत राज राज्य मंत्री कपिल पाटील, उत्पादन शुल्क तथा ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण,कृषीमंत्री अब्दुल सत्तार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, आदी उपस्थिती होते.

- Advertisement -

मुख्यमंत्री पुढे बोलताना, मला ही स्वप्न वाटत होते की क्लस्टर कसे होणार परंतु आज ते स्वप्न सत्यात उतरत असल्याचा आनंद आहे. अनधिकृत, धोकादायक इमारतीसाठी कोणतीही योजना नव्हती. आम्ही आंदोलन केली, रस्त्यावर लढाई केली, मोर्चा काढला. पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात याला तत्वत: मान्यता मिळाली. परंतु खºया अर्थाने २०१४ ला देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यासपूर्ण काम करून त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला. कृषीमंत्र्यांनी त्वरित प्लॉट दिला असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.

मी माझ्या आयुष्यात कोणाचे नुकसान केले नाही केवळ दोन्ही हातांनी देण्याचे काम केले आहे. क्लस्टर माझे स्वप्न होते, ९७ साली साईराज पडली तेव्हा आम्ही पाच दिवस काम केले. तेव्हापासून क्लस्टर च्या मागे लागलो. त्यांच्या किंकाळ्या आजही मी विसरू शकत नाही. मी मुख्यमंत्री असलो तरी संवेदनशील कार्यकर्ता आहे. तेव्हा नागपूरला जाऊन आंदोलन केले. २७ वर्षे आम्ही हा संघर्ष केला. आम्ही मतदारसंघातील इमारती कोसळू नये म्हणून पावसाळ्यात देवाची प्रार्थना करायचो. उघड्या डोळ्यांनी आम्ही हे पाहू शकणार नाही. विधिमंडळच्या इमारती वरून उडी घेऊन आत्महत्या करू असा इशारा दिला. तेव्हा सहकाºयांनी साथ दिली. त्यानंतर खºया अथार्ने क्लस्टरला मान्यता मिळाली. अनेक अफवा पसरवल्या जात होत्या. पण देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असतांना मला साथ दिली. क्लस्टर च्या मागे फडणवीस यांचा सिंहाचा वाटा आहे. निवडणुका नाही. पण प्रत्यक्षात क्लस्टर चे काम सुरु आहे. सिडको चे जे काम सुरु आहे त्यापेक्षा उत्तम दजार्चे काम क्लस्टरच्या माध्यमातून करण्याच्या सुचना दिल्या आहेत. पहिल्या टप्प्यात दहा हजार घरे बांधणार. १५०० हेक्टर जागेवर क्लस्टर राबविण्यात येणार असून जे आशियातील सर्वात मोठे क्लस्टर ठरणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. माझ्या आयुष्यातील हा सर्वात महत्वाचा दिवस आहे. मी जेव्हा या लोकांना घराच्या चाव्या देईन तो सोन्याचा दिवस असेल. सर्व सोयी सुविधा उपलब्ध करू, एस आर मध्ये सर्वांना घरे देता येत नाही. पण क्लस्टर मध्ये घरे मिळतील. या सरकार च्या मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भक्कम पाठिंबा आहे. सर्व प्रस्ताव मान्य करतात अमित शहा चा ही पाठिंबा असून त्यांनी छाती ठोकपने निर्णय घेतले. सामान्य नागरिकांसाठी निर्णय घेतले. अडीच वर्षात सरकारला दहा वर्षे मागे नेण्याचे काम केले. पण मी आणि फडणवीस यांनी सर्व अडथळे दूर केले. सर्वांच्या आयुष्यात सुखाचे दिवस यावे ही इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

एक आपल्यासाठी एक चांगला दुग्धशर्करा योग म्हणावे लागेल – आयुक्त
ठाणेकरांसाठी भाग्याचा दिवस आहे आणि असेच म्हणता येईल, कारण आज हा कार्यक्रम आजच होणार अपेक्षित होता. आजपर्यंत शुभारंभ झाला नाही त्याचे कारणही एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार होते. ते मुख्यमंत्री झाल्यानंतर हा कार्यक्रम होणार होता हा एक आपल्यासाठी एक चांगला दुग्धशर्करा योग म्हणावे लागेल आणि त्या दृष्टिकोनातून आज कामाला सुरुवात होते असे मत ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी व्यक्त केले.

जे काम आहे ते प्री फॅब्रिकेटेड टेक्नॉलॉजीने होईल- डॉ. संजय मुखर्जी
उद्यापासून या ठिकाणी काम चालूच असणार आहे. या ठिकाणी आता दोन साईटवर जे काम आहे, ते काम चालूच ठेवणार आहोत. आज या ठिकाणी ऑलरेडी काम होईल. तसेच टेस्टिंगचे काम चालू आहे आणि ते झाल्यानंतर इथे प्रत्यक्ष बांधकाम सुरू होणार आहे. जे काम आहे ते प्री फॅब्रिकेटेड टेक्नॉलॉजीने या ठिकाणी होणार आहे अशी माहिती सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -