घरठाणेपशु वैद्यकीय दवाखाना उभे राहणार शहापूरात भाड्याच्या नाहीतर हक्काच्या जागेत 

पशु वैद्यकीय दवाखाना उभे राहणार शहापूरात भाड्याच्या नाहीतर हक्काच्या जागेत 

Subscribe
 ज्या शहापुरात गेली अनेक वर्षे भाड्याच्या जागेत पशु वैद्यकीय रुग्णालय सुरू होते. त्याच शहापुरात हक्काच्या जागेत लवकरच पशु वैद्यकीय रुग्णालय उभे राहणार आहे. या रुग्णालयासाठी मांजरे ग्रामपंचायतीने पांढरीचा पाडा येथे जागा उपलब्ध करून दिली असून ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यामतून रुग्णालय उभारण्यासाठी ३८ लाख निधी मंजूर केला आहे.  त्यापैकी ३३ लाख रुपये ही देऊ केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे बळीराजाच्या पशुधनाला नवसंजीवनी मिळणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्यासह विविध सुविधा पुरविण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या खांद्यावर असते. त्याच प्रमाणे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जनावरांसह इतर जनावरांच्या आरोग्याची काळजी जिल्हा परिषदेच्या पशु संवर्धन विभागाच्या माध्यामतून घेण्यात येत असते. त्यानुसार तालुका स्तरावर आणि गाव स्तरावर पशु रुग्णालये उभारण्यात आली असून त्यांचे श्रेणी १ व श्रेणी २ अशा दोन वर्गात त्याची विभागणी देखील करण्यात आली आहे. या रुग्णालयांच्या माध्यामतून जनावरांवर उपचार करण्यात येत असता. तर वेळप्रसंगी त्यांच्यावर याच रुग्णालयाच्या माध्यामतून अत्यल्प दरात शस्त्रक्रिया देखील करण्यात येत असतात.  त्यातच गेल्या अनेक वर्षापासून शहापूर तालुक्यातील मांजरे ग्रामपंचायती अंतर्गत पांढरीचा पाडा येथे भाड्याच्या खोलीत पशु वैद्यकीय रुग्णालय सुरु आहे.
या रुग्णालयाच्या भाड्यापोटी वार्षिक ५ हजार १०० रुपये  खर्च करण्यात येत होता. त्यामुळे पशु रुग्णालयासाठी हक्काची जागा उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आणि अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करण्यात येत होते.  त्यानुसार शहापूर तालुक्यातील मांजरे ग्रामपंचायती अंतर्गत पांढरीचा पाडा येथील मालकीची असलेली जागा या रुग्णालयासाठी आरक्षित करण्यात आली असून त्या संदर्भातील प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तसेच या रुग्णालयाच्या उभारणीसाठी ३८ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून ३३ लाखांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे लवकरच पांढरीचा पाडा येथे हक्काच्या जागेत पशुवैद्यकीय दवाखाना उभारण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पशु वैद्यकीय विभागाने दिली.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -