घरठाणेरुग्णालयासाठी आरक्षित भूखंडावर अनधिकृत बांधकाम

रुग्णालयासाठी आरक्षित भूखंडावर अनधिकृत बांधकाम

Subscribe

दिव्यातील रुग्णालयासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्या अनधिकृत बांधकामाकडे ठामपा अतिक्रमण उपायुक्त अशोक बुरुपूल्ले हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप भाजप ठाणे शहर कार्यकारिणीचे सदस्य रोहिदास मुंढे यांनी केला आहे.

दिव्यातील रुग्णालयासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्या अनधिकृत बांधकामाकडे ठामपा अतिक्रमण उपायुक्त अशोक बुरुपूल्ले हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप भाजप ठाणे शहर कार्यकारिणीचे सदस्य रोहिदास मुंढे यांनी केला आहे. तसेच ते बांधकाम न थांबल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा ही त्यांनी दिला आहे. दिवा शहराची लोकसंख्या जवळजवळ पाच ते सहा लाखाच्या घरात असली तरी येथे महापालिकेचे स्वतंत्र असे कोणतेही रुग्णालय किंवा आरोग्य केंद्र नाही. नागरिकांना अत्यावश्यक परिस्थितीत थेट कळवा अथवा डोंबिवली गाठावे लागते. दिव्यात ठामपाचे सुसज्ज रुग्णालय व्हावे व आरोग्य केंद्र व्हावे यासाठी अनेकदा मागणी करण्यात आली आहे. परंतु रुग्णालयासाठी आणि आरोग्य केंद्रासाठी जागा उपलब्ध नाही, अशी कारणे प्रशासनातर्फे वारंवार पुढे केली जाते. त्यातच दिवा पूर्वेतील दिवा-आगासन रोडवरील मौजे दातीवली सर्व्हे क्र. १४० हिस्सा नंबर ३ ही जागा ठाणे महानगर पालिकेच्या विकास आराखड्यानुसार रुग्णालयासाठी राखीव दर्शविण्यात आली आहे.

सध्या हा भूखंड मोकळा असला तरी तिथे अनधिकृत इमारतीचे बांधकाम करण्यासाठी पायलिंग करण्याचे काम सुरू केले आहे. हे काम सुरू करण्यापूर्वी महापालिकेची कोणतीही परवानगी घेतली नाही. याबाबत ठाणे महानगर पालिकेकडे २२ जानेवारीला लेखी तक्रार केली असतानासुद्धा आरक्षित भूखंडावर अनधिकृत इमारतीचे बांधकाम करण्यासाठी रात्री मशीनद्वारे पायलिंग करण्याचे काम सुरूच आहे. तसेच मोठ्या प्रमाणात लोखंडाचा साठा सदर जागेवर करण्यात आल्याचे ही मुंढे यांनी म्हटले आहे. रुग्णालयासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर सुरू असलेले अनधिकृत इमारतीचे काम त्वरित थांबवून या राखीव भूखंडाला केलेले लोखंडी पत्राचे वॉल कंपाउंड काढून टाकून त्या जागेवर असणारे सर्व साहित्य जप्त करून तो भूखंड महापालिकेने ताब्यात घ्यावा. तसेच ज्या नागरिकांची घर बिल्डरने तोडली आहेत, त्यांचे पुनर्वसन त्या बिल्डरकडून करून घ्यावे, अन्यथा याविरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा भाजप दिवा मंडळातर्फे दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त यांना दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

PM appeal on Farmer Protest : MSP वर कायदा बनवा, आम्ही चर्चेस तयार – शेतकरी संघटना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -