घरताज्या घडामोडीPM appeal on Farmer Protest : MSP वर कायदा बनवा, आम्ही चर्चेस...

PM appeal on Farmer Protest : MSP वर कायदा बनवा, आम्ही चर्चेस तयार – शेतकरी संघटना

Subscribe

मोदींच्या भाषणावर शेतकरी संघटनांची पहिली प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत राष्ट्रपतींनी केलेल्या अभिभाषणावर बोलताना शेतकऱ्यांना नव्या कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन संपवण्याची मागणी केली आहे. त्यामुळेच कृषी कायद्यात जर कोणती कमतरता असेल तर ती आपणी दूर करू, कोणी त्रुटी असेल तर ती दूर करेल. पण शेतकऱ्यांनी आपले आंदोलन आता थांबवावे आणि आपआपल्या घरी परतावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पंतप्रधानांच्या या आवाहनला शेतकरी संघटनेकडूनही प्रतिउत्तर आले आहे. भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकैतने प्रतिक्रिया देत स्पष्ट केले आहे की, आमचा मोर्चा आणि कमिटी चर्चेसाठी तयार आहे. आमच व्यासपीठ आणि घोषणाही तिच आहे. एमएसपी (MSP) च्या विषयावर बोलताना ते म्हणाले की एमएसपीवर कायदा झाला तर शेतकऱ्यांचा फायदाच होईल. (Bhartiya kisan union spokesperson responded on Pm modi’s appeal to farmer’s)

देशात भूकेचा व्यापार नको. धान्याची किंमत ही भुकेवर निश्चित होणार नाही. भूकेचा व्यापार करणाऱ्यांना देशाबाहेर काढले जाईल. देशात आज पाण्यापेक्षा स्वस्त असे दूध विकले जात आहे. शेतकऱ्यांना दुधासाठीचे भांडवल जास्त मोजावे लागत आहे, पण तुलनेत या दुधासाठी मिळणारा दर हा कमी मिळत आहे. म्हणूनच दुधाचा दरही निश्चित व्हायला हवा असे टिकैत म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांना गॅसवर असणारी सबसिडी सोडण्याची मागणी केली आहे, त्यानुसारच पंतप्रधानांनी खासदार आणि आमदार यांना पेंशन सोडण्याचे आवाहन करावे असे ते म्हणाले. जर खासदार आणि आमदारांनी पेंशन सोडली तर किसान भारतीय युनियन त्यांचे आभारच मानेल.

- Advertisement -

शेतकरी आंदोलनावर काय म्हणाले होते पंतप्रधान ?

पंतप्रधानांनी आज सोमवारी राज्यसभेत भाषण करताना म्हटल आहे की, आता शेतकरी आंदोलनावर भरपूर चर्चा झाली आहे. सर्वाधिक कोणती गोष्ट सांगण्यात आली असेल तर ती शेतकऱ्यांच्या आंदोलनाशी संबंधित सांगण्यात आली आहे. कोणत्या गोष्टीवर आंदोलन आहे, त्याबाबतचे मौन आहे. जी मूलभूत गोष्ट आहे, त्यासाठीवर चर्चा व्हावी. शेतकरी आंदोलनावर आता राजकारण होऊ लागले आहे. मी शेतकऱ्यांना विश्वास देतो की, भाजी मंडई अधिक आधुनिक होईल. एमएसपी होती, एमएसपी आहे आणि एमएसपी राहणार असेही ते म्हणाले. म्हणूनच शेतकऱ्यांनी आंदोलन संपवावे असे ते म्हणाले. शेतकरी आंदोलनात अनेक जेष्ठ लोक आंदोलनात बसले आहेत. त्यामुळेच सर्व शेतकऱ्यांना घरी परतण्याची मागणी त्यांनी केली.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -