घरठाणेदादोजी कोंडदेव क्रीडा संकुल उपहारगृहाचा भाडेमाफी प्रस्ताव पटलावर

दादोजी कोंडदेव क्रीडा संकुल उपहारगृहाचा भाडेमाफी प्रस्ताव पटलावर

Subscribe

येत्या 3 मार्च रोजी होणार्‍या महासभेसमोर मंजुरीसाठी

कोरोना कालावधीत दादोजी कोंडदेव क्रिडागृहातील उपहारगृह बंद असल्याने त्या उपहागृह चालकाने या काळातील सात महिन्यांचे भाडे माफ करण्याची विनंती महापालिकेकडे केली. त्या विनंती वरून महापालिकेने प्रस्ताव तयार करून ६ लाख २० हजार २०५ रुपयांच्या भाडेमाफीचा प्रस्ताव येत्या 3 मार्च रोजी होणार्‍या महासभेसमोर मंजुरीसाठी आहे. पण, त्या उपहागृह चालकाकडून सप्टेंबर ते डिसेंबर २०२० ते जानेवारी,फेब्रुवारी आणि मार्च २०२१ या कालावधीतील ४७ हजार २७३ रुपयांचे भाडे वसुल केले जाणार आहे.

कोरोनाच्या कालावधीत इतर आस्थापनाप्रमाणे दादोजी कोंडदेव क्रिडागृहातील उपहारगृहाला फटका बसला. या कालावधीत ते उपहारगृह देखील बंद राहिल्याने उपहारगृह चालकाने एप्रिल ते ऑगस्ट २०२० या कालावधीतील ३ लाख ३७ हजार ६८६ रुपयांचे भाडे पालिकेला अदा केलेले आहे. ही रक्कम सप्टेंबर ते डिसेंबर २०२० व मार्च २०२१ या पाच महिन्यांच्या कालावधीत भाडे भरणा न केल्याने एप्रिल २०२० ते ऑगस्ट २०२० या कालवधीतील भाडे माफ करुन समायोजित करण्याची विनंती संबंधितांनी पालिकेकडे केली आहे. त्यानुसार आता ३ लाख ३७ हजार ६८६ रुपयांची रक्कम ही समायोजित केली जाणार आहे.

- Advertisement -

तर एप्रिल ते नोव्हेंबर २०२१ या कालवधीत या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु होते. त्यामुळे या कालावधीतील ६ लाख २० हजार २०५ रुपयांचे भाडे माफ करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. तर सप्टेंबर ते डिसेंबर २०२०, मार्च २०२१ व जानेवारी व फेब्रुवारी २०२१ या कालावधीतील ४७ हजार २७३ रुपयांचे भाडे पालिका वसुल करायचे ठरवले असून त्यानुसार तो भाडेमाफीचा प्रस्ताव महासभेच्या पटलावर मंजुरीसाठी आणण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -