घरठाणेगांधीनगरच्या पाईपलाईनवरील पूल वाहतुकीस खुले

गांधीनगरच्या पाईपलाईनवरील पूल वाहतुकीस खुले

Subscribe

वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल

वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत नव्याने तयार करण्यात पोखरण रोड नं. 2 वरील  बीएमसी पाईपलाईनवरील दोन्ही पूल वाहतुकीस खुले करण्यात आले आहेत. यामुळे या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार असल्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले. पोखरण रोड न. 2 चे रुंदीकरण करण्यात आले आहे. यामध्ये ४० मीटर रुंदीचा रस्ता तयार करण्यात आला आहे, परंतु बीएमसी पाईपलाईनवरील पुलाचे काम येथील अतिक्रमण व अन्य कारणास्तव मार्गी लागले नव्हते. या ठिकाणी सर्व अडथळे दूर करुन दोन्ही बाजूच्या पुलाचे काम नुकतेच पुर्ण झाले असून सदर पूल वाहतुकीस खुले करण्यात आले आहे. सदर ठिकाणी रेमंड कंपनीच्या बाजूस 89.60 मीटर  तर सुभाष नगरच्या बाजूस 120.60 मीटर पुलाचे काम करण्यात आले आहे. दोन्ही बाजूचे पुल वाहतुकीस खुले केल्यामुळे उपवन, वसंतविहार, ग्लॅडी अल्वारिस रोड, पवारनगर, महाराष्ट्र नगर, खेवरा सर्कल, हॅप्पी व्हॅली, सिंध्दाचल, कोकणीपाडा आदी विभागाकडे होणारी वाहतूक सुरळीत होणार आहे. तसेच अरुंद पुलामुळे होणारी वाहतूक कोंडी देखील मार्गी लागली आहे.

या रस्त्याच्या नजीक असलेल्या श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया स्कूलची देखील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शाळकरी मुले, नोकरदार वर्ग यांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळाला आहे. प्रलंबित रस्ते व पुलाचे प्रकल्प मार्गी लावून तसेच नवीन मार्ग प्रस्तावित करुन शहरातील वाहतुक कोंडीच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी महानगरपालिका व इतर शासकीय यंत्रणा प्रयत्नशील आहेत. नुकत्याच सुरू झालेल्या कळवा पूल, नवीन कोपरी पूल या पुलांमुळे ठाणे शहरातील दोन महत्वाचे प्रवेश मार्ग वाहतूक कोंडीमुक्त झाले, त्याचपध्दतीने अंतर्गत वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पोखरण रोड क्र. 2 वरील गांधीनगर पूल ही महत्वाची लिंक आहे, ज्याचे सहा वर्षापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण करुन सदर पूल नागरिकांना वाहतुकीसाठी खुला करुन देण्यात आला आहे, भविष्यामध्येही प्रलंबित प्रकल्प मार्गी लावून वाहतूक कोंडीतून मार्ग निघेल यासाठी प्रयत्न केला जाईल असेही आयुक्त बांगर यांनी नमूद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -