Eco friendly bappa Competition
घर क्राइम मुंब्रा रेतीबंदर किनारी सापडल्या जिलेटिनच्या कांड्या आणि डेटोनेटर्स

मुंब्रा रेतीबंदर किनारी सापडल्या जिलेटिनच्या कांड्या आणि डेटोनेटर्स

Subscribe

ठाणे : मुंब्रा रेतीबंदर किनारी पुन्हा एकदा 16 जिलेटिनच्या कांड्या व 17 डेटोनेटर्स मिळाल्या असून तो मुद्देमाल पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या कांड्या पाण्याखाली स्फोट घडवून आणण्यासाठी वापरण्यात येतात, अशी माहिती देण्यात आली आहे. परंतु या कांड्यांपैकी अनेक कांड्या या जिवंत असल्याने त्या इतर ठिकाणी स्फोट घडवून आणण्यासाठी देखील वापरला जाऊ शकतात, असेही आता बोलले जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या ठिकाणी हा मुद्देमाल आढळून आला आहे. त्या ठिकाणी मनसूख हिरन यांचा मृतदेह आढळला होता. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Gelatin sticks and detonators found on Mumbra sandbar shores)

हेही वाचा – ठाणे महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांची देणी थकविल्याप्रकरणी कंपनी आणि कंत्राटदाराला टाकले काळ्या यादीत

- Advertisement -

मुंब्रा रेतीबंदर येथे अवैधरित्या रेती उत्खननाचे काम देखील गेले अनेक वर्ष अविरतपणे सुरू आहे. याच ठिकाणी मनसुख हिरन याच्या मृतदेहासोबतच आत्तापर्यंत 16 मृतदेह देखील या परिसरात आढळले होते. मंगळवारी पुन्हा एकदा मुंब्रा रेतीबंदर विसर्जन घाट हा जिलेटीन कांड्या व डेटोनेटर्स मिळाल्याने चर्चेत आला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी आणि बॉम्बशोधक पथकाने धाव घेत 16 जिलेटिनच्या कांड्या, 17 डेटोनेटर्स आणि दोन मोठ्या बॅटऱ्यांसह सर्व साहित्य ताब्यात घेतले असून पोलिसांमार्फत सखोल चौकशी सुरु केली आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरून एक मोबाईलचा रिकामा बॉक्स देखील मिळाला असून त्यावर असलेल्या imei नंबर चा वापर गुन्हेगारांना शोधण्यासाठी करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या जिलेटिनच्या कांड्या व डेटोनेटर कोणी, कोणाकडून आणि कशासाठी घेतल्या होत्या याची देखील सखोल चौकशी करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी मुंब्रा पोलिसांमार्फत तपास सुरू आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मनोज जरांगे पाटलांशी अधिकृतपणे चर्चा व्हावी, एजंटच्या माध्यमातून नाही; राऊतांचा राज्य सरकारला टोला

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचे गूढ अद्यापही कायम 

दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी सापडलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह 5 मार्च रोजी मुंब्रा रेतीबंदर किनारी सापडला होता. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचे गूढ अद्यापही कायम आहे. त्यांनी आत्महत्या केली की त्यांच्यासोबत घातपात झाला, हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांची हत्या झाल्याचा दावा केला आहे.

- Advertisment -