घरठाणेभिवंडी पोलिओ मुक्त करण्यासाठी मुलांना पोलिओ लस द्या

भिवंडी पोलिओ मुक्त करण्यासाठी मुलांना पोलिओ लस द्या

Subscribe

अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांचे आवाहन

भिवंडी पोलिओ मुक्त करण्यासाठी  पल्स पोलिओ मोहीम आजपासून महानगरपालिकेच्यावतीने सुरु करण्यांत आलेली आहे. नागरीकांनी केंद्रावरील व त्यानंतर घरोघर होणा-या लसीकरण मोहीमेत सहभागी होऊन आपल्या मुलांचे प्रभावीपणे लसीकरण करुन घेणे. तसेच या राष्ट्रीय कार्यात सहभागी होऊन भिवंडी पोलिओ मुक्त करण्यास हातभार लावावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी शहरात पल्स पोलिओ केंद्राचे उदघाटन प्रसंगी केले.

जागतिक आरोग्य संघटनांच्या सुचनेप्रमाणे भारतातून पल्स पोलिओसारखा गंभीर आजार हद्दपार करण्यासाठी  केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणानुसार विविध स्थानिक संस्थांच्या स्तरांवर लसीकरणाचे कार्यक्रम घेतले जात आहे. पोलिओ मुक्त भारत अभियानांतर्गत पल्स पोलिओ लसीकरण मोहीम प्रत्येक रा॒ज्या॑मध्ये राबविली जात आहे. त्याच अनुषंगाने भिवंडी पोलिओ मुक्त करण्यासाठी आज भिवंडी शहरामध्ये ४१९ केंद्रांवर आणि तीन दिवस घरोघरी जाऊन महानगपालिका कर्मचा-यामार्फत वय वर्षे ० ते ५ या वयोगटातील बालकांचे पल्स पोलिओचे लसीकरण केले जाणार आहे.

- Advertisement -

शहरातील इंदिरा गांधी स्मृती रुग्णालय या ठिकाणी पोलिओ लसीकरण मोहीमेचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी केले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी वैद्यकिय आरोग्य विभागाच्या वैद्यकिय अधिकारी डॉ. बुशरा सय्यद ऊपस्थित होत्या. लसीकरण मोहीमेसाठी नियुक्त मनपा कर्मचारी, आशा वर्कर, विविध सामाजिक संस्था, एनजीओज, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी यांनी केंद्रांवरील व घरोघरी सुरु होणा-या पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेमध्ये विशेष कामगिरी करून योग्य तो समन्वय राखून काम करावे आणि आपले लसीकरणाचे टार्गेट यशस्वीपणे पूर्ण करावे, असेही अतिरिक्त आयुत यांनी शेवटी सांगितले.सदर उदघाटन प्रसंगी आरोग्य विभागाच्या डॉ. वर्षा बारोट, आरोग्य विभागाचे कर्मचारी, फिल्ड ऑफिसर, नागरीक व लाभार्थी मुले, संबंधित कर्मचारी इ.उपस्थित होते,

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -