घरताज्या घडामोडीकुस्तीपटूंना ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेसचा मोदींवर हल्लाबोल; जूना व्हिडीओ शेअर करत म्हणाले...

कुस्तीपटूंना ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेसचा मोदींवर हल्लाबोल; जूना व्हिडीओ शेअर करत म्हणाले…

Subscribe

जंतर-मंतरवर गेल्या महिन्यापासून आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी आपला आवाज उंचावण्याकरता नव्या संसद भवनासमोर महापंचायत घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कुस्तीपटुंचा हा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. आंदोलनासाठी निघालेल्या कुस्तीगीर आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत.

जंतर-मंतरवर गेल्या महिन्यापासून आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी आपला आवाज उंचावण्याकरता नव्या संसद भवनासमोर महापंचायत घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कुस्तीपटुंचा हा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. आंदोलनासाठी निघालेल्या कुस्तीगीर आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. (Vinesh You Belong To My Family Congress Shared That Old Video Of The Prime Minister)

या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल करणाऱ्या महिला खेळाडूंना अशी वागणूक मिळाल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. शिवाय, काँग्रेसच्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांचा एक जुना व्हिडीओ शेअर करत पंतप्रधानांवर टीका केली आहे.

- Advertisement -

काँग्रेसने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये बजरंग पुनिया, विनेश फोगाटसह काही खेळाडू पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत चर्चा करत आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी विनेश फोगाटला “तू तर माझ्या कुटुंबातील एक आहे. तुझ्या संपूर्ण कुटुंबाला ओळखतो. तुला मी निराश पाहू शकत नाही”, असे नरेंद्र मोदी या व्हिडीओमध्ये म्हणाले आहेत. काँग्रेसने हा फोटो ट्वीट करून “हमारे देश की बेटिया” असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडीओसोबत आजच्या आंदोलनाचे फुटेजही त्यात टाकण्यात आले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

- Advertisement -

भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला होता. त्यानंतर ब्रिजभूषण सिंह यांच्यावर गुन्हाही दाखल झाला. मात्र, ब्रिजभूषण सिंह यांच्या अटकेची मागणीकरत कुस्तीपटू 23 एप्रिलपासून जंतर-मंतर मैदानावर आंदोलन करत आहेत. त्यापार्श्वभूमीवर कुस्तीपटूंनी जंतर-मंतर ते नवे संसद भवन अशा मार्चचं आयोजन केले होते.

त्यानुसार कुस्तीपटू 11:30 मिनिटांनी नव्या संसद भवनाकडे निघाले होते. पण, त्यापूर्वीच पोलिसांनी कुस्तीपटू साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनिया यांच्यासह अन्य काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यावेळी पोलीस आणि कुस्तीपटूंमध्ये झटापट झाल्याचे समोर आले. बजरंग पुनियानेदेखील ट्वीट करून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “एखादं सरकार आपल्या खेळाडूंबरोबर असे वागते का? आम्ही काय गुन्हा केला आहे”, असे सवाल बजरंग पुनियाने उपस्थित केला आहे.


हेही वाचा – IPL 2023 CSK vs GT : आयपीएलचा अंतिम सामना पावसाने धुतला; मोदी स्टेडियममधून प्रेक्षक परतले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -