घररायगडशिवजयंती साजरी करण्याबाबत खोपोली पोलिसांच्या सूचना

शिवजयंती साजरी करण्याबाबत खोपोली पोलिसांच्या सूचना

Subscribe

शहरात सर्व धर्मीय लोक गुण्यागोविंदाने सर्व सण उत्सवासह शिवजयंती साजरी करत असल्याची परंपरा आजही कायम ठेवली आहे. यंदाही परंपरा राखत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरे करा असे आवाहन येथील पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिरीष पवार यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत केले. मिरवणुकीच्या काळात ध्वनी प्रदूषण टाळा उगाच आम्हाला गुन्हे दाखल करण्याची संधी देऊ नका, असेही ते म्हणाले.

खोपोली: शहरात सर्व धर्मीय लोक गुण्यागोविंदाने सर्व सण उत्सवासह शिवजयंती साजरी करत असल्याची परंपरा आजही कायम ठेवली आहे. यंदाही परंपरा राखत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरे करा असे आवाहन येथील पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिरीष पवार यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत केले. मिरवणुकीच्या काळात ध्वनी प्रदूषण टाळा उगाच आम्हाला गुन्हे दाखल करण्याची संधी देऊ नका, असेही ते म्हणाले.
रविवारी असलेल्या शिवजयंती महोत्सवाच्या निमित्ताने खोपोली पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार यांनी शांतता कमिटीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला शिळफाटा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राजीव आभानी, सुभाष पोरवाल, रवींद्र रोकडे , राजेंद्र फक्के, राष्ट्रवादी महिला शहर अध्यक्ष सुवर्णा मोरे, भाजपाचे दिलीप पवार, दीपक गायकवाड , नगरपालिकेचे अधिकारी जाधव , गणेश म्हात्रे तसेच महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.
खोपोली नगर परिषदेच्या वतीने उद्या शासकीय शिवजयंती साजरी केली जात असून यादरम्यान शहरात अनेक ठिकाणी मिरवणुका काढल्या जात असल्याने यावेळी कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासंबंधीच्या सूचना पवारांनी बैठकीत बोलताना दिल्या.

सहकार्य करण्याचे आवाहन
शहरात वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी पोलिसांना सहकार्य करा, सोशल मीडियावर कुठलेही चुकीचे मेसेज फॉरवर्ड करू नका, शिवजयंती निमित्त काही ठिकाणी अनधिकृत महाराजांचे पुतळे बसविले जातात त्यामुळे वाद होण्याची शक्यता असते, ते होऊ नयेत तसेच शिवजयंतीदिनी कोणताही अनुसुचित प्रकार घडू नये यासाठी सूचना करतानाच दक्षता कमिटीने पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवारयांनी केले.
——-

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -