घरठाणेthaneधक्कादायक! टेनिस प्रशिक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पीडिता गरोदर

धक्कादायक! टेनिस प्रशिक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पीडिता गरोदर

Subscribe

ठाणे : टेनिस प्रशिक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडली आहे. या प्रकरणी कपूरबावाडी पोलिसांनी टेनिस प्रशिक्षकाला अटक केले आहे. ही घटना ठाण्यात घडली असून अल्पवयीन मुलगी ही 7 आठवड्याची गर्भवती असल्याची माहिती हिंदुस्तान टाईम्सने दिली आहे. टेनिस प्रशिक्षकावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि टेनिस प्रशिक्षकाला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.

या टेनिस प्रशिक्षकाचे नाव रविकिरण गवळी असून ते नवी मुंबईचा रहिवाशी आहे. पीडित मुलीला टेनिस शिकवण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती, अशी माहिती मिळाली आहे. कपूरवाडी पोलीस स्टेशनने दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पोटात दुखत असल्याची तक्रार तिने पालकांकडे केली होती.

- Advertisement -

हेही वाचा – हृदयद्रावक! दिल्लीत एका कार चालकाने 200 मीटरपर्यंत व्यक्तीला नेले फरफटत; वाचा सविस्तर

यानंतर पीडित मुलीच्या पालकांनी तिला डॉक्टरांकडे नेहले. तेव्हा डॉक्टरांनी तिला औषध दिले. पण दोन दिवसानंतरही पीडित मुलीची पोट दुखणे थांबले नाही. यानंतर पीडित मुलीला रुग्णलयात दाखल करण्यात आले. तेव्हा मुलीची सोनोग्राफी करण्यात आली. यानंतर जे कळाले ते धक्कादायक होते की, मुलगी सात आठवड्यांची गरोदर होती. टेनिस प्रशिक्षकाचे लग्न झाले असून त्याला दोन मुले आहेत. हा टेनिस प्रशिक्षक म्हणून मुलांना कोचिंग करत होता. आरोप हा अनेक शाळा आणि सोसायटीमध्ये टेनिस प्रशिक्षक देत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -