जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे शनिवारी कोपरी परिसरातील वाहतुकीत बदल

traffic education

 कोपरी वाहतूक उप विभागाचे हद्दीत भास्कर कट येथील चिखलवाडी शौचालयाचे समोरील भूमिगत जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम ११ मार्च २०२३ रोजी पहाटे ०६.०० वाजेचे दरम्यान करण्यात येणार आहे. यावेळी परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त सुभाष बुरसे यांनी दिली.

असा आहे वाहतुकीतील बदल
कोपरी सर्कल कडून भास्कर कट मार्गे तीन हात नाका कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना भास्कर कट येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही वाहने कोपरी सर्कल कडून भास्कर कट मार्गे तीन हात नाका येथे जाणारी वाहने ही भास्कर कट येथून संत नामदेव ब्रिज वरुन नौपाडा पोलीस ठाणे मार्गे तसेच संत नामदेव ब्रिज खालून टेलीफोन नाका मार्गे इच्छीत स्थळी जातील. तीन हात नाका सर्व्हिस रोडने रघुवेल हॉटेल कडून भास्कर कट कडे येणाऱ्या जड अवजड वाहनांना रघुवेल हॉटेल तीन हात नाका येथे तसेच जड-अवजड वाहनासाठी भास्कर कट येथुन तीन हात नाका ठाणे येथे प्रवेश बंदी केली आहे. ही वाहने मेन रोडने कोपरी ब्रिज मार्गे आनंदनगर चेक नाका येथील चौकी जवळून यु टर्न घेवून इच्छित स्थळी जातील. तसेच आकाराने लहान व हलकी वाहने रघुवेल हॉटेल कडून भास्कर कट कडे येणा-या सर्व्हिस रोडने सुचिता को. ऑप. सोसायटी येथून डावीकडे वळून इच्छीत स्थळी जातील. तर तीन हात नाका येथील ब्रिज खालून व तीन हात नाका येथील ब्रिज वरुन भास्कर कट कडे येणा-या सर्व वाहनांना गुरुद्वारा कट येथे प्रवेश बंद केल्याने ही वाहने मेन रोडने कोपरी ब्रिज मार्गे आनंदनगर चेक नाका येथील चौकी जवळून यु टर्न घेवून इच्छित स्थळी जातील. ही वाहतूक अधिसूचना ११ मार्च २०२३ रोजी पहाटे ०६:०० वाजेपर्यंत लागू करण्यात येत आहे. ही वाहतूक अधिसुचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रूग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नाही, असे ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त, मुख्यालय २ अतिरिक्त कार्यभार पोलीस उप आयुक्त सुभाष बुरसे यांनी दिली आहे.