घरठाणेठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत कुठे ? मनसे आमदार राजू पाटील यांचा सवाल

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत कुठे ? मनसे आमदार राजू पाटील यांचा सवाल

Subscribe

मुंबई आणि पुण्याप्रमाणे ठाण्याच्या पालकमंत्र्यांनीही आढावा बैठक घेण्याची मागणी आमदार राजू पाटील यांनी केली आहे.

राज्यात कोरोना महामारीचे संकट आले आहे. रुग्णसंख्या वाढल्याने बेड मिळत नसल्याने रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे हाल होत आहे. ऑक्सिजन बेड, रेमडेसिवर यांचा तुटवडा निर्मान झाला आहे. अशातच मुंबई आणि पुण्यात महापौर, पालकमंत्री आणि आयुक्त एकत्रित येऊन बैठका घेतात. केडीएमसीत प्रशासक म्हणून आयुक्त आहेत. महापौर नाही. मात्र, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री कुठे आहेत? असा सवाल मनसे आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केला. आमदार राजू पाटील यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना हा प्रश्न उपस्थित केला. कल्याण डोंबिवली महापालिकेत कोरोना रुग्णांची संख्या एक लाखाच्या पार गेली आहे. या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी आमदार राजू पाटील, डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांनी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची  भेट घेतली.

 

- Advertisement -

यावेळी पाटील यांनी आयुक्तांना काही सूचना देखील केल्या. लसीकरण काही केंद्रांवर सुरु आहे. मात्र लसीचे डोस कमी प्राप्त होतात. तेव्हा आधी केंद्रे जास्त उभारा. डोस प्राप्त झाल्यावर लसीकरण थांबणार नाही, अशी सूचनाही त्यांनी केली. डोंबिवली मधील शिवमंदिर ची स्मशानभुमी ही मध्यवर्ती भागांत आहे. सध्या कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूमुळे या स्मशानभूमीवर प्रचंड ताण येत आहे. स्मशानभुमी मध्ये सुद्धा रांगा लागल्याचे विदारक दृश्य दिसत आहे. यामुळे डोंबिवली पुर्वेला व पश्चिमेला अद्ययावत स्मशानभुमी उभारावी अशी मागणी देखील त्यांनी आयुक्तांकडे केली.

 

- Advertisement -

आयुक्तांनी यांवर सकारात्मक प्रतिसाद देताच आमदारांनी तात्काळ नगररचना विभागाचे प्रमुख मा.द. राठोड यांची भेट घेतली. यावर तात्काळ पाहणी करुन जागा निश्चीती करावी व सदरचा प्रस्ताव मंजुरीसाठी आयुक्तांना पाठवावा आणि स्मशानभूमीसाठी आमदार निधी तात्काळ उपलब्ध करुन देऊ असे या बैठकीत आमदार राजू पाटील यांनी सांगितले. तर मुंबई आणि पुण्यात महापौर, पालकमंत्री आणि आयुक्त एकत्रित येऊन बैठका घेतात. त्याप्रमाणे पालकमंत्र्यांनीही आढावा बैठक घेण्याची मागणी आमदार राजू पाटील यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -