घरट्रेंडिंगक्रातिसिंह नाना पाटील; स्वातंत्र्य चळवळीतील धगधगता निखारा

क्रातिसिंह नाना पाटील; स्वातंत्र्य चळवळीतील धगधगता निखारा

Subscribe

स्वातंत्र्य लढ्यात मौल्यवान कामगिरी करणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांना माय महानगरकडून विनम्र अभिवादन. या लेखामार्फत त्यांच्या कर्तृत्वाला अभिवादन करण्यासाठी माय महानगरचा एक छोटासा प्रयत्न.

देशाच्या स्वातंत्र्य संग्रमातील एक मौल्यवान सेनानी म्हणून क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याकडे बघितलं जातं. नाना पाटील यांच्या नेतृत्वामुळे देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला एक वेगळे वळण मिळाले. ब्रिटिशांच्या हुकूमशाही विरोधात नाना पाटलांनी जी क्रांतीची हाक दिली त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. त्यांच्या या नेतृत्वाने महाराष्ट्रातील समाज जीवनात अामूलाग्र बदल घडून क्रांतीची नवी संकल्पना खेड्यापाड्यातील तरुण कार्यकर्त्यांमध्ये रुजवली गेली. त्यामुळे त्यांना क्रांतिसिंह म्हणून ओळखले जाऊ लागले. या क्रांतिकारी नाना पाटलांची भाषणालाही तलवारा इतकी धार होती. त्यांच्या एकाच गर्जनेने शेकडो लोक मृत्यूला आव्हान द्यायचे. अशा या महान क्रांतिकारी स्वातंत्र्यसैनिक नाना पाटील यांची आज जयंती! त्यांच्या जयंती दिनानिमित्ताने त्यांच्या जीवनचरित्राचा घेतलेला हा आढाव.

जन्म

क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म ३ ऑगस्ट १९०० रोजी सांगली जिल्ह्यातील येडेमच्छिंद्र या गावात झाला. नाना पाटलांना वाळवा हे गाव खूप आवडायचे. त्यामुळे ते वाळव्यात वास्तव्यास असायचे. नानांनी शिक्षण पुर्ण झाल्यानंतर काही काळ तलाठी म्हणून नोकरी केली. परंतु, समाजकारण आणि राजकारणाची ओढ असलेल्या नाना पाटलांचे मन फार काळ नोकरीत गुंतले नाही. त्यामुळे त्यांनी नौकरी सोडली आणि समाजकारणात आयुष्य व्यथित करण्याची दृढ इच्छा केली. नोकरी सोडल्यानंतरी स्वातंत्र्य लढ्यासाठी त्यांनी १९३० साली घर सोडले आणि नंतर कधीच घराकडे परतले नाहीत.

- Advertisement -

स्वातंत्र्य लढ्यातील मौल्यलवान कामगिरी

स्वातंत्र्य लढ्यात नाना पाटलांची कामगिरी वाखणण्याजोगी आहे. स्वातंत्र्य लढ्यासाठी १९३० साली त्यांनी घर सोडले आणि स्वातंत्र्य लढ्याच्या सविनय कायदेभंग चळवळीत सहभाग घेतला. त्यांच्यावर वारकरी सांप्रदायाचा प्रभाव होता. ग्रामीण भागातील लोकांना स्वातंत्र्यांची जाणीव व्हावी, यासाठी त्यांची कळकळ महत्वपूर्ण होती. त्यांनी जनजागृती करत लोकांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी केले. १९४२च्या ‘चले जाव’ आंदोलनात त्यांनी महत्वाची कामगिरी केली. या आंदोलना दरम्यान, ब्रिटिश सरकारच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन, आपले स्वत:चे हक्काचे एक वेगळे सरकार असावे, असा विचार नाना पाटलांच्या मनात आला. याच विचारसणीतून प्रतिसरकारचा उदय झाला. प्रतिसरकारला पत्रीसरकार असेही म्हणतात. ‘आपुला आपण करु कारभार’ हे धोरण मनाशी बाळगत त्यांनी ब्रिटिश सरकारच्या बरोबररीला पत्रीसरकारची स्थापना केली. यापत्रीसरकारची स्वतंत्र अशी कार्यप्रणाली होती. पत्रीसरकारने लोकन्यायालय, अन्नधान्य पुरवठा, बाजार व्यवस्था अशी अनेक लोकपयोगी कामे केली. एक स्वतंत्र अशी फौज गावागावांत उभी केली. या फौजेसाठी लाठ्याकाठ्यांपासून ते बंदूकींपर्यतची हत्यारे उभे केली. पत्रीसरकारने ब्रिटिश सरकारचा खजिना लुटला. हा खजिना धुळ्यात डॉ. उत्तमराव पाटील आणि त्यांच्या पत्नी डॉ. लिलाताई पाटील यांच्या नेतृत्वाने लुटला गेला. १९४२ पर्यत नाना पाटील ८ वेळा तुरुंगात जाऊन आले होते. त्यानंतर ते भूमिगत चळवळीत सहभागी झाले. ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी बक्षिसे लावली होती. त्यांचे घरदार, जमीन सर्वांवर ब्रिटिश सरकारने बंदि आणली होती. महात्मा फुले आणि राजर्षी शाहू माहाराजांचे आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन त्यांनी अंधश्रद्धा निर्मुलनाचे कामे केली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही नाना पाटील यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील महत्वाची कामगिरी केली. १९५७ मध्ये ते सातारा मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आणि १९६७ मध्ये बीड मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पक्षातून लोकसभेवर निवडून आले होते.

मृत्यू

स्वातंत्र्य चळवळीत एक नाविण्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या क्रांतिसिंह नाना पाटील यांची ६ डिंसेबर १९७६ रोजी प्राणज्योत मावळली. त्यांच्या आवडत्या वाळवा गाव्यात त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले. पारतंत्र्याचे सावट असणाऱ्या देशात स्वातंत्र्यांचे तेजस्वी पहाट उगवण्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांची कामगिरी मोलची आहे. त्यांची हिच कामगिरी देशाच्या इतिहासाच्या पानांवर सुवर्ण अक्षरांनी लिहिली गेली आहे. अशा या महान स्वातंत्र्य सेनानीस माय महानगरचा मानाचा मुजरा…

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -