घरमुंबईमुलुंडमध्येझालेल्या चेंगराचेंगरीत एक जण गंभीर जखमी

मुलुंडमध्येझालेल्या चेंगराचेंगरीत एक जण गंभीर जखमी

Subscribe

मुलुंडमध्ये आज सकाळी औषध व्यवसाय परिषदेच्या कार्यालयाबाहेर ऑफलाईन नोंदणी करताना चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीमध्ये एक जण जखमी झाला आहे.

एलफिन्स्टन पुलावर २९ सप्टेंबर २०१७ रोजी चेंगराचेंगरी झाली होती. या चेंगराचेंगरीमध्ये २२ प्रवाशांनाचा मृत्यू झाला होता. या घटनेची पुन्हा एकदा पुनरावृत्ती होता होता वाचली आहे. आज मुलुंडमध्ये सकाळी औषध व्यवसाय परिषदेच्या कार्यालयाबाहेर ऑफलाईन नोंदणी करताना चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीमध्ये अनिकेत श्रृंगारे हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला मुलुंडच्या फोर्टीस रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे.

नेमके काय घडले?

मुलुंड येथील पश्चिमेला औषध व्यवसाय परिषदेचे कार्यालय आहे. या कार्यालबाहेर आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास ऑफलाईन नोंदणीसाठी तरुणांनी मोठी गर्दी केली होती. तरुणांने लांबचलांब रांगा लावल्या होत्या. मात्र त्यादरम्यान पावसाने अचानक हजेरी लावली आणि सर्वांचीच तारांबळ उडाली. पाऊसात भिजले जाऊ नये म्हणून तरुणांनी धावपळ करण्यास सुरुवात केली. तर काही तरुणांनी कार्यालयाबाहेरच्या शेडखाली उभे राहण्याचा प्रयत्न केला. सर्वच तरुण त्या कार्यालयाच्या शेडचा आडोसा घेण्याचा प्रयत्न करत असताना चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीमध्ये चार तरुण जखमी झाले आहेत. यामध्ये अनिकेत श्रृंगारेला गंभीर दुखापत झाली असून त्या तरुणाला मुलुंडच्या फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या या तरुणावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -