घरमनोरंजनकमल हसनमुळे विश्वरुपम २ ला 'रेड सिग्नल'

कमल हसनमुळे विश्वरुपम २ ला ‘रेड सिग्नल’

Subscribe

कमल हसन आणि विश्वरुपमचे चाहते या सिनेमाची वाट पाहत आहेत. या सिनेमात अभिनेता  आणि दिग्दर्शक अशी भूमिका बजावली आहे.  पण या याचिकेनंतर या सिनेमाचे काय होणार हा प्रश्नच आहे.

कमल हसनचा मोस्ट अवेटेड सिनेमा ‘विश्वरुपम २’ पाहण्याचा प्लॅन तुम्ही केला असेल तर थांबा. हा सिनेमा सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कदाचित १० ऑगस्टला हा सिनेमा रिलीज होऊ शकणार नाही. कारण या सिनेमाविरोधात मद्रास हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. एका प्रोडक्शन हाऊसने कमल हसन विरोधात ही याचिका दाखल केली असून त्यांनी कमल हसनचा हा सिनेमा रिलीज करु नये, अशी मागणी या याचिकेतून केली आहे.

प्रकरण काय?

पिरामीड साईमीरा /राजकमल फिल्मज इंटरनॅशनल या प्रोडक्शन हाऊसच्या ‘मर्मयोगी’ या सिनेमाचे दिग्दर्शन आणि अभिनय करण्यासाठी कमल हसन यांनी २ एप्रिल २००८ला अनुमती देत कागदपत्रांवर सह्या केल्या. हा सिनेमा बीग बजेट सिनेमा होता. तामिळ आणि हिंदी भाषेत हा सिनेमा करायचे प्रोडक्शन हाऊसच्या मनात होते. यासाठी त्यांनी ४ कोटी कमल हसन यांना देऊ केले. पण काही कारणास्तव कमल हसन यांनी या सिनेमाचे काम सुरु केले नाही. या संदर्भात कमल हसन यांनी प्रोडक्शन हाऊसला कोणतीही सूचना दिली नाही. ही रक्कम परत केली नाही. आता ही रक्कम ८ कोटीच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे जो पर्यंत हे पैसे कमल हसन परत करत नाहीत तो पर्यंत विश्वरुपम २ हा सिनेमा रिलीज करण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.

- Advertisement -

विश्ववरुपम २ चे काय होणार ?

कमल हसन आणि विश्वरुपमचे चाहते या सिनेमाची वाट पाहत आहेत. या सिनेमात अभिनेता  आणि दिग्दर्शक अशी भूमिका बजावली आहे.   पण या याचिकेनंतर या सिनेमाचे काय होणार हा प्रश्नच आहे. विश्वरुपमच्या तुलनेत विश्वरुपम २ हा सिनेमा अधिक अॅक्शनने भरलेला असणार आहे. या सिनेमात अभिनेत्री पूजा कुमार, एंड्रिया, शेखर कपूर, राहुल बोस, वहिदा रहेमान असून हा सिनेमा तामिळ आणि हिंदीत येणार आहे. पण आता सुनावणी कधी होणार आणि या सिनेमाच्या रिलीजचा मार्ग मोकळा होणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

 

- Advertisement -

(सौ. रिलायन्स इंटरटेन्मेंट)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -