घरट्रेंडिंगVideo : खेळण्यातील ट्रकने चिमकुल्याने ओढला चक्क 'जेसीबी'; आनंद महिंद्रांनी व्हिडिओ पोस्ट...

Video : खेळण्यातील ट्रकने चिमकुल्याने ओढला चक्क ‘जेसीबी’; आनंद महिंद्रांनी व्हिडिओ पोस्ट करत केले कौतुक!

Subscribe

सध्या सोशल मीडियावर खेळण्यातील छोट्याश्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने मातील रुतलेला जेसीबी ओढणाऱ्या चिमुकल्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. यात चिमुकला मोठ्या जेसीबीला खेळण्यातील ट्रॅक्टर दोरीच्या साहाय्याने बांधून ओढताना दिसतोय. हे बघताना खरं असा भास होतो, खरंच की हा चिमुकला चिखलात रूतलेला जेसीबी ओढतोय. व्हिडिओ काही का असेना मात्र चिमुकल्या स्वॅग वाखडण्याजोगा आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. आत्तापर्यंत या व्हिडिओला ३४ लाखहून अधिक वेळा पाहिले गेले आहे.

- Advertisement -

हा व्हिडिओ शेअर करत उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी लिहिले की, तुमच्या मुलांचा आत्मविश्वास वाढवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. परंतु तुमच्यापैकी कोणी आमच्या खेळण्यातील महिंद्रा ट्रॅक्टरने हा प्रयत्न करत असल्यास , कृपया लक्षात ठेवा की पालकांनी सावधगिरी बाळगा.’

आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर शेअर केलेला हा व्हिडिओ ४ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला असून त्याला २३ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. याशिवाय जवळपास २५०० वेळा री-ट्विटही करण्यात आले आहेत. या व्हिडिओवर युजर्स अनेक भन्नाट प्रतिक्रिया देत ​​आहेत.

- Advertisement -

आनंद महिंद्रा यांच्या ट्विटवर एका युजरने लिहिले की, ‘निश्चितपणे, कोणत्याही भारतीय गरीब कृषी कुटुंबासाठी ही स्वस्त वस्तू असणार नाही, कारण त्याची किंमत त्यांच्या वार्षिक उत्पन्नापेक्षा जास्त आहे.’

तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, ‘व्वा अद्भुत, मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांच्या मागच्या सीटवर बसणे, त्यांना शांतपणे मार्गदर्शन करणे आणि त्यांच्यावर लक्ष ठेवणे.’

तर तिसऱ्या युजरने लिहिले, ‘प्रेरणादायक, लहान मूल याचा आनंद घेताना दिसतोय. The Tractor Kid.


PM Modi in Varanasi: पंतप्रधानांची मध्यरात्रीच बनारस रेल्वे स्थानकावर सरप्राईझ व्हिजिट; विकासकामांचा घेतला आढावा


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -