घरट्रेंडिंगVideo: शेतकऱ्याने गायलं जस्टिन बीबरचं 'बेबी' गाणं

Video: शेतकऱ्याने गायलं जस्टिन बीबरचं ‘बेबी’ गाणं

Subscribe

या शेतकऱ्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जगभरात हॉलिवूड गायक जस्टिन बीबरचं ‘बेबी’ हे गाणं सुप्रसिद्ध आहे. हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर बऱ्याचं लोकांनी जस्टिन बीबरसारखं गाण्याचा प्रयत्न केला तरी देखील त्याच्यासारखं कोणीचं गाऊ शकलं नाही. मात्र हेचं गाणं एका शेतकऱ्याने जस्टिन बीबरसारख हुभेहुभ गायलं आहे. ‘बेबी’ हे गाणं गातानाचा शेतकऱ्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा शेतकरी मुलगा प्रदीप असून तो अवघ्या २६ वर्षांचा आहे. त्याला शेतात काम करताना गाणी गायला खूप आवडतं. हा कर्नाटक मधील चित्रदुर्ग जिल्हातील आहे.

द न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, प्रदीप हा आपल्या नृत्याने आणि गाण्याने गावातल्या लोकांचे मनोरंजन करतो. जरी त्याचं गाणं गावकऱ्यांना समजलं नाही तरी गावकऱ्यांना त्याच्या चेहऱ्यावर हावभाव खूप आवडतात.

- Advertisement -

प्रदीपने सांगितलं की, पदवीचे शिक्षण घेत असताना इंग्रजीमध्ये नापास झाला होता आणि त्यावेळेस त्याला थोडंफार इंग्रजी बोलता येत होत. काही दिवसानंतर त्याला इंग्रजी भाषा आवडू लागली. त्यामुळे त्याने इंग्रजी गाणे ऐकण्यास सुरुवात केली. त्याला फक्त इंग्रजी गाणे येत असं नाही तर त्याला चिनी आणि जपानी गाणी देखील गाता येतात.

पुढे तो असा म्हणाला, ‘मला चिनी आणि जपानी भाषा कशी बोलायची माहित नाही. परंतु मी या दोन भाषेमधील गाणी ऐकतो आणि त्याच्या उच्चार आणि सूरांवर जास्त लक्ष देतो. मी जेव्हा काम करतो तेव्हा इयरफोनच्या साहाय्याने गाणी ऐकतं राहतो. देवाच्या कृपेने मी गाणं आणि गायकानुसार माझी गाण्याची शैली बदलू शकतो.’ गाणं गाणे ही प्रदीपची फक्त आवड आहे. तो प्रत्यक्ष शेतकरी असून तो शेतात काम करतो. हा प्रदीपचा युट्यूबवरचा बेबी गाणं गाताना व्हिडिओ आहे. तुम्ही देखील हा व्हिडिओ पाहा.

- Advertisement -


हेही वाचा – मुंबईच्या वडापावला टक्कर देण्यासाठी आलाय गुलाबजाम पाव! व्हिडिओ व्हायरल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -